Join WhatsApp group

सुरेश जोगडे यांचे धरणे आंदोलन तहसीलदारांच्या आश्वासनानंतर मागे

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर: दि. २६ जुलै २५ : हादगावातील विविध मागण्यांसाठी सुरेश जोगडे यांनी सुरू केलेले धरणे आंदोलन आज तहसीलदारांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आले. तहसीलदार मा. सौ. शिल्पा बोबडे मॅडम यांनी आंदोलकांच्या सर्व मुद्द्यांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

या दरम्यान झालेल्या चर्चेमध्ये खालील निर्णय घेण्यात आले.

🔹 रोजगार सेवक व श्री मंगलम कार्यालयास नोटीस बजावण्यात आली असून ७ दिवसांत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. माहिती अपूर्ण किंवा चुकीची आढळल्यास रीतसर कारवाई केली जाईल.

🔹शेतकरी कर्जमुक्तीबाबतचा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला असून तो SDO मार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

🔹 आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हजेरी लावली. विविध अडचणींचे अर्ज ग्रामपंचायतीस सादर करण्यात आले असून गटविकास अधिकारी यांनी वन टू वन चौकशी करून रोजगार सेवकावर कार्यवाही करण्याचे सांगितले.

🔹 रु. 2,25,000/- ची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात मा. शिवदास मधुकर राऊत, देवेंद्र बोळे, अतुल शिंदे, हरिभाऊ शेकार, संजय गुल्हाने, संजय शिंदे, आकाश किर्दक, प्रदीप डांगे, संजय जोगळे, प्रभाकर जोगळे, सुभाष खाटिंग, धम्मा गोपकर व अनेक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. गावातील महिला व पुरुषांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

सुरेश जोगडे यांनी सांगितले की, “भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत, प्रशासनाने वेळेत कार्यवाही करावी, हीच अपेक्षा.”


Share

Leave a Comment

error: Content is protected !!