Join WhatsApp group

बीडमध्ये माजी उपसरपंचाची आत्महत्या : ‘पूजा गायकवाड कोण?’ या प्रश्नावर चर्चेचा उहापोह

Photo of author

By Sarkarmzanews

Share

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (34) यांनी आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली आहे. कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अडकलेल्या गोविंद यांनी तिच्या घरासमोर कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली. प्रेमातील अबोल आणि वाद हे कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पूजा गायकवाडची ओळख चर्चेत

घटनेनंतर स्थानिकांपासून सोशल मीडियापर्यंत “त्या नर्तिकेची खरी ओळख काय?” हा प्रश्न चर्चेत आहे. संबंधित नर्तिका म्हणजे पूजा गायकवाड (21), सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावची रहिवासी. जवळपास दीड वर्षांपासून ती विविध कला केंद्रांमध्ये नृत्य सादर करत होती. याच दरम्यान गोविंद यांच्याशी तिची ओळख झाली व नंतर ती प्रेमसंबंधात परिवर्तित झाली.

कुटुंबीयांचे गंभीर आरोप

गोविंद यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, पूजाने प्रेमसंबंध टिकवण्यासाठी गोविंदकडून मोठ्या प्रमाणात पैसे आणि भेटवस्तू घेतल्या. तिने मिळालेल्या पैशांतून नातेवाईकांच्या नावावर प्लॉट खरेदी केला. एवढेच नव्हे, तर पाच एकर शेती भावाच्या नावावर करून द्यावी, गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर करावे, अशा मागण्या तिने केल्या होत्या. या मागण्या पूर्ण न केल्यास दुष्कर्माचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या दबावामुळेच गोविंद यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.

सोशल मीडियावरून वाढले संशयाचे धुके

पूजा गायकवाड सोशल मीडियावर सक्रिय होती. आत्महत्येच्या दिवशी तिने तीन रील्स पोस्ट केल्या होत्या. मात्र त्यानंतर ती सोशल मीडियावर पूर्णपणे शांत आहे. या योगायोगामुळे चर्चेला अधिक उधाण आले आहे.

नवीन प्रश्नचिन्हे

या प्रकरणामुळे केवळ बीडच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यात “पूजा गायकवाड कोण होती?” हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कला केंद्रातील कलाकारांचे जीवन, त्यांच्या स्थानिक नेत्यांशी असलेले संबंध, तसेच कार्यपद्धती यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

सध्या पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात असून, चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे. मात्र एका तरुण नेत्याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे आणि ‘पूजा गायकवाड’ हे नाव चर्चेचे केंद्र बनले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!