Join WhatsApp group

रस्त्याच्या कामावरील – ग्रेडर मशिन ने घेतला विद्यार्थीचा बळी,यळवण नजीकची घटना.

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १० :बार्शीटाकळी : बार्शीटाकळी पोलिस स्टेशन हद्दीतील कानशिवनी ते विझोरा मार्ग अकोला रस्त्याचे काम सुरू आहे, या हे काम यंत्राच्या साहाय्याने सुरू आहे. या मार्गावर वाहतुकीचे प्रमाणही वाढले आहे, वाहतूक लक्षात घेऊन सदर रस्ता काम दक्षता घेत करणे आवश्यक आहे, परंतु कुठल्याही प्रकारची दक्षता न घेता सदर यंत्र चालकाने रिव्हर्स घेत असताना दुचाकीवरील पाठीमागून येणाऱ्या दुचाकीला जबरदस्त धडकली.

या मध्ये दुचाकीस्वार विद्यार्थ्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली, सुमित ढोरे वय २३ असे मृतक विद्यार्थ्यांचे नाव आहे,सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कानशिवनी येथील सुमित कैलास ढोरे वय २३ हा विद्यार्थी अकोल्यातील मेहबानु महाविद्यालयात शिकत होता,

दरम्यान नेहमी प्रमाणे सकाळी आपली दुचाकी क्रमांक एम एच 30 व्ही.६६४० शाळेत जाण्यासाठी आपल्या दुचाकीवरून जात असताना यळवण नजीक सदर रस्त्याचे काम सुरू होते,

या कामासाठी संबंधितांनी ग्रेडर मशिन या यंत्राच्या साहाय्याने सुरू होते,तर सदर चालकाने निष्काळजीपणामुळे पाठीमागे असलेल्या दुचाकीस्वार येत आहे किंवा नाही याची खात्री न करता किंवा एखाद्या रोडवर दिशा दर्शक किंवा लाल झेंडा वापरून करून रोडचे काम सुरू आहे हे वास्तव दर्शविली नाही,

त्यामुळे पाठीमागून अकोला कडे आपल्या दुचाकीवरून जात असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या लक्षात आले नाही,तोच ग्रेडर मशिन यंत्राने क्षणात चिमुकला शाळकरी विद्यार्थ्याचा जीव घेतला, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बोरगाव मंजू पोलिस व बार्शीटाकळी पोलिसांनी धाव घेतली,

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एकच झुंबड उडाली, दरम्यान अपघाता नंतर सदर यंत्र चालकाने घटनास्थळावरून पसार झाला, दिशा दर्शक फलक किंवा लाल झेंडा घेऊन कुणी असते तर जीव वाचला असता सदर रस्त्याचे काम सुरू असताना दुतर्फा वाहन चालक सतर्क होण्यासाठी ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी काम सुरू आहे असे दिशा दर्शक फलक किंवा लाल झेंडा घेऊन हाती एखाद्या व्यक्तीला ठेवणं आवश्यक आहे.

परंतु संबंधित विभागाने दुर्लक्ष केले, त्यामुळे निष्पाप शाळकरी विद्यार्थ्याचा जीव घेतला..


Share

Leave a Comment

error: Content is protected !!