Join WhatsApp group

पारधी समाजाबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी निवेदन, एससी-एसटी ॲक्ट अंतर्गत कारवाईची पारधी समाजाच्या युवकांची मागणी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर (दि. २४ जुलै २५): एका इंस्टाग्रामवरील एका युजरने पारधी समाजाबद्दल आक्षेपार्ह व बदनामीकारक व्हिडिओ (Reel) तयार करून समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पारधी समाजात संतापाची लाट उसळली आहे.

deva_from_amravati’ या आयडीवरून सदर व्हिडिओ प्रसारित करण्यात आला असून, या व्हिडिओत पारधी समाजावर चुकीचे आरोप करून समाजाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या संदर्भात पारधी समाजातील प्रतिनिधींनी मूर्तिजापूर पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन, संबंधित इंस्टाग्राम युजरवर एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायदा (SC/ST Atrocities Act) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, अशा प्रकारचे व्हिडिओ समाजात तेढ निर्माण करणारे असून, त्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास समाजबांधव आंदोलनाचा इशारा देतील.

पोलिसांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी व संबंधित व्यक्तीविरुद्ध त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी समाजबांधवांनी केली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!