Join WhatsApp group

सृजन साहित्य संघाची काव्य मैफल आनंदात संपन्न!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १० : मुर्तिजापूर: सृजन साहित्य संघ मूर्तिजापूर व सहकारी साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने,लोटस् इंटरनॅशनल पब्लीक स्कूल,मूर्तिजापूर येथे काव्यमैफल आनंदात संपन्न झाली.

अध्यक्ष म्हणून कवी सचिन तराळ होते.ग्रंथपूजन व उपस्थित कवी,अध्यक्ष यांचे शब्दसुमनांनी स्वागत करून मैफल सुरु झाली.कवी रामकृष्ण आसरे,कमलनारायण जयस्वाल,रवींद्र जवादे,सुनिल डोंगरदिवे,सचिन तराळ,लक्ष्मण कुऱ्हेकर,विजय इंगळे,माधवराव काळे,सुनिल ढोकणे,राजेंद्र भटकर, मिलिंद इंगळे,कल्पक कांबळे,गजानन चव्हाण आणि डॉ.स्वाती पोटे,मीना जवादे,विदयाताई गोसावी,रेणू नागोरे, मायाताई दवंडे यांनी सुंदर,आशयपूर्ण रचना,गीते व गझल सादर केल्यात.

मीना जवादे यांनी महिन्याचे कवी उपक्रमांर्तगत कवी रवींद्र जवादे यांची रचना सादर केली.मैफलीमध्ये काही कवींना दोन रचना सादर करण्याची संधी मिळाली, त्यामुळे उपस्थित कवींनी काव्य रचनांचा भरपूर आनंद घेतला.

प्रास्ताविक,संचलन व आभार रवींद्र जवादे यांनी मानले.मूर्तिजापूर येथील शायर मोहम्मद नूर यांचे मागील आठवड्यात निधन झाल्याने,त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.राष्ट्र संतांच्या वंदनेने मैफलीचा समारोप झाला.

गझलदीप प्रतिष्ठान,कलाविष्कार साहित्य संस्था,नेहरु युवा मंडळ,ज्ञान नर्मदा बहु.संस्था,जिगीषा महिला मंच,संस्कार भारती मूर्तिजापूर यांचे हे संयुक्त आयोजन होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!