Join WhatsApp group

एकल महिला परिषद व परिचय मेळावा संपन्न. कालबाह्य वाईट रूढी परंपरांना तिलांजली देऊन एकल महिलांनी प्रगती करणे काळाची गरज!!जिल्हाधिकारी अजित कुंभारे यांचे प्रतिपादन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक 10 : अकोला: एकल महिला सन्मान चळवळ अंतर्गत एकल महिला परिषद व परिचय मेळावा महिला व बाल विकास विभाग अकोला, माणस फाउंडेशन,सेवाधर्म शिक्षण व बहुउद्देशीय संस्था अकोला,एन्करेज एज्युकेशनल फाऊंडेशन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्तएकल महिला परिषद व परिचय मेळावा जानोरकर मंगल कार्यालय, कौलखेड अकोला येथे संपन्न झालेल्या या मेळाव्याला उद्घाटनिय मार्गदर्शन करताना जुन्या वाईट चालीरीती रूढी परंपरा अंधश्रद्धा यांना तीलाजली देऊन एकल महिलांनी आपला सर्वांगीण विकास करून घेण्याची गरज आहे .

कोणत्याही वाईट प्रसंगाला न घाबरता शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा त्यासाठी शासन आपल्या नेहमी पाठीशी राहील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.

या मेळाव्यात जिल्ह्यातील एकल महिला त्यांचे प्रश्न समस्या विवंचना, सक्षमीकरण, शासन योजना, पुनर्वसन आदी विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शक केले .तसेच शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यात आले. सदर मेळाव्याचे उ‌द्घाटक मा.श्री. अजित कुंभार जिल्हाधिकारी, अकोला यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे.

तर कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी सौ अनिता गुरव जिल्हा महिला व बाल विकास समिती अकोला यांनी भुसवले .या मेळाव्याची प्रास्ताविक. श्री दत्तात्रय श्रीरामजी लहाने, मानस फाऊंडेशन बुलढाणा यांनी केले असून या कार्यक्रमाला त्यांनी महिलांच्या समस्यांविषयी व विकासाविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.

प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री. गिरीश पुसदकर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अकोला, श्रीमती रजिया सुलताना बुलढाणा ,मा. आरती टाकळकर सामाजिक कार्यकर्त्या एकल महिला परिषद व परिचय मेळावाला विशेष सहकार्य व मार्गदर्शन मा. श्री. नरेश मानकर ,मा. डॉ. नेहा मानकर, तुषार हांडे, मा. प्रा. शिवराम बावस्कर, मा. श्री. गजानन हरणे समाजसेवक, मा. श्री. राजू लाडूलकर (डी.सी.पी.यु.), मा. श्री. सुनील लाडूलकर, मा.. श्री. सुनिलभाऊ वनारे ,मा. श्रीमती रुपाली पांडे (जिल्हा संरक्षण अधिकारी) यांचे लाभले आहे.एकल महिला सन्मान चळवळ अंतर्गत एकल महिला परिषद (विधवा, परितक्त्या, घटस्फोटित) व परिचय मेळाव्याचे आयोजन महिलांना सक्षम बनवणे या दृष्टीने आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच केले .

सदर परिषदेचा मुख्य उद्देश विधवा, घटस्फोटित महिलांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना सक्षम बनवण्या करता सहकार्य करणे,रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

आत्मनिर्भर होण्याकरता समुपदेशन करणे,शासकीय योजनांची माहिती करून देणे,समाजात मूल असणाऱ्या महिलांनी पुनर्विवाह करू नये, असा समज प्रचलित आहे. तरी सामाजिक पुनः एकात्मिकरणं आणि पारिवारिक सुरक्षित आधार मिळण्याच्या दृष्टीने पुनर्विवाह करण्यासाठी प्रोत्साहीत करणे आदी उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या एकल महिला परिषद व परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात उपस्थित असलेल्या सर्व महिला पुरुषांनी शपथ घेऊन एकल महिलांचां मान सन्मान ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची शपथ घेतली. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ, आदींच्या प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले .

या मेळाव्याला अकोला जिल्ह्यातील एकल महिलांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. शासनाच्या विविध योजना समजून घेतला व फॉर्म भरून घेतले. एकल महिलांच्या विकासात्मक अनेक ठराव पास करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा भुतेकर, आभार प्रदर्शन नरेश मानकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरता तुषार हांडे, गजानन हरणे,महेंद्र गणोदे , प्रमोद धर्माळे, सुनील वानरे ,शुभांगी लावुडकर यांच्यासह विविध सामाजिक संस्था संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम शांततेत परंतु उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचा शेवट स्नेहभोजनाने करण्यात आला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!