Join WhatsApp group

बाजोरिया हटवा शिवसेना वाचावा चा शिवसैनिकांकडून विरोध सुरू

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २३ – अकोला – अकोल्यातील शिवसेना मध्ये सुरू झालेल्या अंतर्गत संघर्षाला आता थेट आगीतून उतरवले आहे अकोल्यात संतप्त शिवसैनिकांनी माजी आमदार आणि शिंदे गटाचे संपर्क नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात आक्रमक रणशिंग फुंकले गेले आहेत बाजोरिया यांच्या पुतळ्याला आग लावून थेट संघर्ष रूप दिल ही घटना पक्षातील अंतर्गत वादाच्या संघर्षाचं टोकदार रूप ठरली आहे गेल्या काही दिवसापासून बाजोरिया यांच्या कार्यपद्धती विरोधात शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती आकाशवाणी केंद्राजवळ तिरंगा रॅली संदर्भात झालेल्या बैठकीत एकमुखी निषेध झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरत बाजोरिया यांचा पुतळा पेटवून दिला या घटनेमुळे अकोल्यात तनाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.


बाजोरिया यांच्यावर गंभीर आरोप करत संघटना तोडून स्वतःचा फायदा करून घेत असल्याचा आरोप बाजोरिया यांच्यावर लावण्यात आला सरकारी निधीचा दुरुपयोग करून खाजगी भूखंडावर सुविधा निर्माण केली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार शाहिद खान पठाण यांना मदत केली गोपी किशन बाजोरिया यांच्यावरील या आरोपांनी वातावरण अधिकच तापले आहे एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता मोठे संकट उभा राहिला आहे एकीकडे संपर्क नेते दुसरीकडे रस्त्यावर उतरलेले आणि आक्रमक झालेले स्थानिक नेतृत्व शिंदेंनी जर वेळेवर हस्तक्षेप केला नाही तर अकोल्यात शिवसेना शिंदे गटाचा अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या काही महिन्यात भाजपातील असंतुष्ट नेते शिवसेनेत दाखल झाले आणि थेट पद मिळवली यामुळे पारंपारिक व जुने शिवसैनिक यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यात आता बाजोरिया यांचा स्वार्थ आणि काँग्रेसची लागेबांधे उघड झाल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता अधिकच वाढली आहे.

या स्फोटात घडामोडीनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष एकनाथ शिंदेंकडे लागले आहे शिंदे बाजोरिया यांना वाचवतात की कार्यकर्त्यांचा राग शांत करतात हे पाहणं रंजक ठरेल कोणता निर्णय घेतला जातो हे अकोल्यातील आगामी निवडणुकीवर मोठा परिणाम घडू शकते,बाजोरिया हटाव शिवसेना बचाव, ही आता केवळ घोषणा राहिलेली नाही ती शिवसैनिकांच्या मनातील जळती ज्वाला बनली आहे ती ज्या दिवशी नेतृत्वाच्या दिशेने धावेल त्या दिवशी शिंदे गटासाठी अकोल्यात माघार अपरिहार्य ठरेल.


यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा विषय हा महत्त्वाचा ठरला, गेले तीन वर्षापासून पक्षासाठी काम करत असलेले सर्व शिवसैनिक संभ्रमात होते, की पक्ष वाढवण्यासाठी झटणाऱ्या जिल्हाप्रमुखांवरच अन्याय होत असेल तर आम्हाला निवडणुकीच्या वेळेस कोण न्याय देणार, गेल्या 18 वर्षाच गोपीकिशन बाजोरिया यांच राजकारण पाहिलेल्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो त्यांच्यापासून न्यायाची आशा आम्हाला नाही, असा सुरु दिला
यावेळी शिवसैनिकांचा रोष हा आवरण्यासारखा नव्हता, तरी अकोला शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले व श्रीरंग दादा पिंजरकर यांनी तुमच्या वर अन्याय होणार नाही आपण लवकरच मुंबई जाऊन शिंदे साहेबांची भेट घेऊ अशे सांगितले व आखरीच्या क्षणापर्यंत आम्ही अकोल्यातील पक्षा साठी मेहनत केलेल्या शिवसैनिकांसोबत आहोत माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्यावर अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले त्या वेळेस शिवसेनिकांना धीर आला, व पुढे शिवसैनिकांनी तिरंगा रॅली काढत त्याचा समारोप हुतात्मा स्मारक येथे करून शहिदांना श्रद्धांजली वाहली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!