Join WhatsApp group

सरकार माझा बातमीचा परिणाम: अकोट फैल पोलिसांची धडक कारवाई – इंदौरहून हत्येचे चार फरार आरोपी गजाआड

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : दिनांक ५ जुलै २५:मालमत्तेच्या वादातून एका महिलेवर पेट्रोल ओतून जीवंत जाळल्याच्या खळबळजनक अकोला शहरात घडून हा प्रकरण गुलदस्त्यात गेला होता, “सरकार माझा” बातमीमुळे प्रशासन हललं आणि अखेर अकोट फैल पोलिसांनी इंदौरहून चारही फरार आरोपींना अटक केली.

सुलताना बी मेहमूद खान (वय ४५) या महिलेवर खदान परिसरात पेट्रोल टाकून गंभीररित्या जाळण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच २८ एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. प्रारंभी हा अपघाती मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र बातमी प्रसारानंतर आणि समाजमाध्यमांत दबाव वाढल्यानंतर १३ मे रोजी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

३८ दिवस फरार राहिलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी कठोर आदेश दिले. तपासाची सूत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक जर्नादन खंडेराव यांच्या हाती दिल्यानंतर, त्यांनी अत्यंत चिकाटीने तपास करून इंदौरमधील प्रीतमपुरा बस्ती येथून आरोपींपर्यंत पोहोचले.

अटक करण्यात आलेले आरोपी:

रेहाना खातून अकील खान (वय ४५) – नायगाव

अकील खान नजीर खान (वय ५२)

सुलताना परवीन शेख इम्रान (वय ३०)

समिना बी हुसेन खान (वय २६)

अकोला पोलिस पथकाने खामगावपासून इंदौरपर्यंत जाऊन गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई पार पाडली. ही कारवाई “सरकार माझा” बातमीमुळे निर्माण झालेल्या जनदबावाचं फलित मानली जात आहे.

कारवाई करणारे अधिकारी:

स. पो. नि. जर्नादन खंडेराव योगेश काटकर, अनिस पठाण, संतोष चिंचोलकर, इम्रान शाह, ओम वानवाड, हर्षल श्रीवास, गिरीश तिडकेमार्गदर्शन: अर्चित चांडक (पोलीस अधीक्षक), अभय डोंगरे (अति. पोलीस अधीक्षक), सतीश कुलकर्णी (उपविभागीय पो.अ.)नेतृत्व: पोलीस निरीक्षक शेख रहीम.

ही घटना आणि त्यावरील कारवाई हे दाखवते की माध्यमांनी आवाज उठवल्यास आणि प्रशासन सजग झाल्यास न्याय शक्य आहे. यामुळे सामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण होतो की अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यास परिणाम होतो.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!