Join WhatsApp group

पातूरमध्ये अवैध जुगाराच्या पैशावरून राडा – चार गंभीर जखमी, ऑपरेशन प्रहारचे काय झाले?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

पातूर : दिनांक २२ : शहरातील बादशाह चौकात रविवारी रात्री ९ वाजता दोन गटात झालेल्या वादाने भीषण रूप धारण केले. अवैध जुगार अड्ड्याच्या पैशाच्या वादातून सुरू झालेल्या या हल्ल्यात चाकू व लोखंडी पाईपचा वापर करण्यात आला.

या घटनेत सैय्यद आसिफ सैय्यद अनिस, आझम अली, शेख आवेज शेख बिस्मिल्लाह यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पातूर पोलीस, दंगा नियंत्रण पथक व आरसीपीची तुकडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली व परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, जिल्ह्यात थातूरमातूर कारवाया करून *“ऑपरेशन प्रहार”*चा गाजावाजा करण्यात येत असला तरी स्थानिक पोलीस ठाण्याच्या आशीर्वादा मुळेच असे अवैध जुगार अड्डे बिनधास्त सुरू असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची प्रतिमा काही ठाणेदारांच्या कृतीमुळे धोक्यात येत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

👉 या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!