Join WhatsApp group

उमा बॅरेज प्रकल्प अंतर्गत रोहना गाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत, ग्रामस्थ आमरण उपोषणाला सज्ज

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर, ता.२१ :सन 2007 मध्ये उमा बॅरेज प्रकल्पाला सुरुवात झाली असली तरी या प्रकल्पाच्या काठावरील रोहना गावाला अद्यापही न्याय मिळालेला नाही. आजतागायत गावाचे पुनर्वसन झालेले नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

गावामध्ये रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा व मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. लहान मुलांच्या शिक्षणाकरिता गावात चांगली शिक्षण प्रणाली नसल्याने त्यांना मुर्तीजापूरला जावे लागते असे ग्रामस्थानाकांचे म्हणणे आहे.

घरांची परिस्थिती जीर्ण झालेली असून शासनाकडून पुनर्वसनाचे आश्वासन दिल्यामुळे गावकरी घरांचे नूतनीकरण सुद्धा करू शकत नाहीत. परिणामी युवकांच्या विवाह प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

तसेच गावाच्या शेजारीच नदी असल्यामुळे अर्धवट सुरू असलेल्या उमा बॅरेज प्रकल्पाचे काम धोकादायक ठरत असून चुकून ढगफुटीसदृश पाऊस पडल्यास त्याचे परिणाम थेट ग्रामस्थांनाच भोगावे लागणार आहेत.

पुनर्वसनाच्या नावाखाली गावाला कोणताही विशेष निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लवकरात लवकर शासनाने पुनर्वसनाचा मुद्दा मार्गी लावावा असे ग्रामस्थानाकांचे म्हणणे आहे.

शासन दरबारी वारंवार पत्रव्यवहार करूनही न्याय मिळाला नसल्याची ग्रामस्थांची खंत आहे.

शासनाने पुनर्वसन साठी लवकरात लवकर रोहना गावाचा पुनर्वसन करावा या साठी येत्या २८ सप्टेंबर २०२५ पासून रोहना गावकरी नदीपात्रा मध्ये बसून आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा ग्रामस्थांनी केली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!