Join WhatsApp group

“दिल्लीला सन्मान, गावात विकासाला ब्रेक! मुरंबा ग्रामपंचायतीत नागरिकांचे गंभीर आरोप”

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर – १९: मुर्तीजापूर तालुक्यातील मुरंबा गट ग्रामपंचायत हद्दीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला सरपंच पतीने अडथळा आणल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

कमिशनच्या लालसेपोटी काम थांबवण्यात आल्याचे सांगत, काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या कामात हस्तक्षेप करून ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काम सुरू असताना सरपंच पतीने रस्त्याचा जिथे काम सुरू आहे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अडथळा निर्माण केला. यावेळी कर्मचाऱ्यांवर हातपाय तोडण्याची धमकी देत काम बंद पाडण्यात आले. परिणामी गावासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.

दरम्यान, विकासकामांना खोळंबा आणणाऱ्या पतींच्या सरपंच पत्नीला सध्या दिल्लीत होणाऱ्या एका परिषदेसाठी सरपंच म्हणून सन्मानार्थ केंद्र सरकारकडून आमंत्रण देण्यात आल्याचेही गावकरी सांगतात व त्याचा गाजावाजा पोस्टरबाजी पण खूप जोरात सुरू आहे.

अशा परिस्थितीत, “भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेतृत्वाला दिल्लीत सन्मानासाठी का बोलावले जाते?” असा सवाल गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली आरक्षण मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कारभारात पतींचा हस्तक्षेप होत असेल आणि कमिशनखोरीच्या आरोपांमुळे विकासकामे रखडत असतील, तर अशा आरक्षणाचा उपयोग काय, असा रोखठोक प्रश्नही नागरिक विचारत आहेत.

याआधी मुख्यमंत्री यांच्याकडे पती-पत्नीने भेट घेऊन प्रसारमाध्यमांद्वारे साकडे घातल्याची बातमी झळकली होती. मात्र साकडे पूर्ण झाल्यानंतरही कमिशनखोरीच्या लालसे पोटी गावाचा विकास अडवला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

राजकारणाच्या नावाखाली पोस्टरबाजी करून मुरंबा गावाला आदर्श दाखवण्याचा शो ऑफ प्रसार माध्यमांवर करणे व स्वतःचे खोटे राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला जात असून, प्रत्यक्षात गावाचा विकास मात्र कमिशन खोरीच्या लालसेपोटी थांबवला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!