Join Whatsapp

रवी राठी यांनी केला राष्ट्रवादीला राम राम पक्षाला सोपविला राजीनामा पक्षाने चुकीचा निर्णय घेतला या मुळे नाराज

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – २४ ऑक्ट.२४- मुर्तीजापुर – गेल्या दहा वर्षापासून मुर्तीजापुर मतदारसंघात पक्ष संघटन वाढवण्यासाठी रवि राठी यांनी मेहनत घेतली, मागील विधानसभा निवडणुकीत 42 000 मताधिक्य घेऊन पक्षाच्या मतदानामध्ये वाढ केली या अगोदर पक्षाची फक्त या मतदारसंघात 7000 मतदान होते,

रवि राठी यांनी संघटन वाढवलं पक्ष मजबूत केला काही दिवसा अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारासाठी प्रचार केला पक्षाच्या नावावरती अनेक कार्यक्रम घेतले पक्षप्रवेश सोहळे घेतले पक्षासाठी अनेक केसेस अंगावरती घेतल्या मात्र आज जो पक्षाने निर्णय घेतला तो खूप चुकीचा निर्णय घेतला.

गेल्या काही महिन्या अगोदर आलेला एका व्यक्तीला पक्षाने उमेदवारी जाहीर केल्याने सामान्य कार्यकर्ता दुखवले गेले आहे माझे सहकारी सोबती शेतकरी शेतमजूर विद्यार्थी या सर्वांचा मला पाठिंबा आहे.

त्याचबरोबर महाविकास आघाडी मधील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा मला पाठिंबा आहे आजचा निर्णय चुकीचा असल्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश संघटक सचिव पदाचा राजीनामा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पोहोचवला आहे.

पक्षाने घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे, मी येणाऱ्या विधानसभेत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे,यामध्ये जनता माझ्यासोबत आहे मी लढणार आणि जिंकणार असे प्रतिपादन रवी राठी यांनी केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!