Join WhatsApp group

विकट परिस्थितीला न घाबरणारा योद्धा – रवी राठी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – २५ ऑक्टो. २४ – प्रकृती कोणत्या न कोणत्या रुपात माणसाची परीक्षा घेऊन त्याला अधिक बलवान बनविण्याचा प्रयत्न करत असते, पण काही जन या खेळात फसून पराजय स्वीकार करतात. पण मात्र रवी राठीना प्रकृतीच्या या नियमाचे चांगलेच अभ्यास आहे.

परिस्थिती कोणती पण असो मी खंबीर पने लढण्यास तयार आहे असे मत आज रवी राठीचे आहे, राजकारणात कदी काय होईल याचे अंदाज कोणी लाऊ शकत नाही पण मागील दहा वर्षात राजकारणात असून मला चांगले अनुभव आले आहे, पण मला एक गोष्ट समजली कि जनता हे अखेर माय बाप आहे.

मागील दहा वर्षा पासून मी जी मेहनत घेतली कदाचित ती पक्षाला समजली नाही, मागील निवडणुकीत मला ४२००० हजारचा वर मतदान असून सुद्धा मला काही नवीन उमेदवारान मुळे डावलण्यात आले, पैशाची गुर्मी करत निवडणुकी पुरते हे नेते पक्षाला कुठ पर्यंत घेउनं जाणार ?आता हे बघायचे आहे.

शरद पवारांच्या सानिध्यात मी पण काही राजकारणाचे ज्ञान अर्जन केले आहे. मी पण त्यांचा तालमितला एक खेळाडू आहे.

मी आज पर्यंत जनतेचे व पक्षाची कामे निस्वार्थपणे करत आलो व करत राहील लोकशाहीने मला निवडणुकीत उभे राहण्याचे अधिकार दिले आहे. मी वेळ पडल्यास अपक्ष म्हणून सुद्धा उभा राहील अशी तयारी माझी आहे, सगळ्यात मोठी ताकत माझी जनता आहे, आणि ती माझ साथ सोडणार नाही याची मला खात्री आहे,

मतदार संघातील सर्व समाज आज माझा पाठी मागे आहे व सगळ्याना माझा कामाची जान आहे, मला फक्त आता त्याचं आशीर्वादाची परत गरज आहे.

असे रवी राठीने सरकार माझा ला बोलताना सांगितले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!