Join WhatsApp group

अवैध गावठी दारूव्या अडयावर छापा ६७हजार ८००रू चा मुददेमाल जप्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १५ जून २५ : अकोला : अर्चित चांडक(पोलीस अधीक्षक, अकोला) यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे.

आज दिनांक १५.०६.२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमी वरून श्री शंकर शेळके पोलीस निरीक्षक स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बार्शिटाकळी हददीतील ग्राम शिंदखेड मोरेश्वर येथे अवैध रित्या गावठी दारू हातभ‌ट्टी काढत असलेल्या ठिकाणी छापे टाकून गावठी हातभटटी दारू २४ लिटर ४८००/-रू. तसेब दारू काडण्याकरीता वापरण्यात येणारा ४२० लिटर सडवा किं अं ६३८००रू असा एकुण ६७ हजार ८००रू वा मुददेमाल जप्त करून अवैध रित्या तयार केलेल्या दारूचा नाश करण्यात आला व तेथील दारूचे गुत्ये नष्ट केले. आरोपी नामे शहदेव शंकर अवचार याचेवर पोलीस स्टेशन बार्शीटकाळी येथे क.६५ई क.ड.फ महा. दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई माननीय श्री. अर्चित चांडक सा. पोलीस अधीक्षक अकोला, मा. श्री. अभय डोंगरे सा. अप्पर पोलीस अधीक्षक अकोला, श्री. शंकर शेळके पोलीस निरीक्षक स्थागुशा अकोला यांच्या मार्गदर्शनात जिपीएसआय दशरथ बोरकर, पोहवा गोकुळ चव्हान, पोअं स्वप्नील खेडकर, अन्सार अहमद, लीलाधर खंडारे चालक पोअं मनिष ठाकरे यांनी केली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!