Join WhatsApp group

अकोला शहरात महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह – शाळकरी मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला दोन तासांत अटक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला, ५ जुलै २५ : शहरातील महिला सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. जवाहर नगर परिसरात राहणाऱ्या आणि NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ही विद्यार्थिनी शुक्रवारी अकोल्यातील बस स्थानकावर उतरून जवाहर नगरला जाण्यासाठी ऑटोमध्ये बसली. मात्र, तिच्या गंतव्यस्थानी नेण्याऐवजी, ऑटोचालकाने तिला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलगी कसाबसा आरोपीच्या तावडीतून सुटली आणि पोलिसांकडे धाव घेतली.

तिने सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर, महिला पोलिस निरीक्षक मालती कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या दोन तासांत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. आरोपीचे नाव जाफर खान सुभेदार खान (वय ४८, रा. नायगाव) असे असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला ऑटो (एमएच ३० ई ९४९७) जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विनयभंगासह POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अलिकडच्या काळात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याची चिंता नागरिक आणि पालक वर्ग व्यक्त करत आहेत. याआधी खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला मारहाण करून व्हिडिओ व्हायरल करण्याचे प्रकरणही ताजे असतानाच, ही घटना घडल्याने प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सार्वजनिक वाहतूक आणि ऑटो रिक्षा चालकांवर पोलीस प्रशासनाने कडक नजर ठेवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!