Join WhatsApp group

९ कोटींच्या जीएसटी घोटाळा प्रकरणात प्रतिक तिवारी यांना जामीन– अमरावती न्यायालयाचा निर्णय, कार्यवाहीवर बेकायदेशीरतेचा ठपका

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला :जीएसटी विभागाच्या ९.९७ कोटी रुपयांच्या कथित करचुकवेगिरी प्रकरणात अटकेत असलेले प्रतिक गिरीराज तिवारी यांना अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

श्री. बालाजी ट्रेडर्सचे मालक असलेले तिवारी यांना १६ जुलै २०२५ रोजी अमरावती जीएसटी विभागाने गुन्हा क्रमांक B-113 अंतर्गत अटक केली होती.विभागाच्या आरोपानुसार, खोट्या दस्तऐवजांच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती.

त्यानंतर त्यांना न्याय दंडाधिकारी (कनिष्ठ स्तर), कोर्ट क्र. ३ अमरावती येथे हजर करण्यात आले. यावेळी विभागाने पी.सी.आर.ची मागणी केली होती. मात्र, बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. प्रशांत देशपांडे यांनी युक्तिवाद करत ही मागणी न्यायालयाकडून फेटाळण्यात आली.

नंतर जामीनासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर सुनावणीदरम्यान, जीएसटी विभागाने असिस्टंट कमिश्नर (स्टेट टॅक्स) यांच्यामार्फत आपला जबाब सादर केला.

मात्र, अ‍ॅड. प्रशांत देशपांडे आणि अ‍ॅड. मोहित जैन यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर न्यायालयाने विभागाची कारवाई ही कायदेशीर प्रक्रियांचा भंग करणारी असल्याचे मान्य करत प्रतिक तिवारी यांना जामीन मंजूर केला.

या प्रकरणात बचाव पक्षाच्या वकिलांना अ‍ॅड. प्रकाश चितलांगे, अ‍ॅड. गणेश गंधे, अ‍ॅड. राणी मंडळे आणि अ‍ॅड. प्रथमेश तिवारी यांनी सहाय्य केले.

उल्लेखनीय बाब म्हणजे अमरावती विभागात इतक्या मोठ्या रकमे संदर्भातील ही पहिलीच कार्यवाही होती, जिथे न्यायालयाने स्पष्टपणे जीएसटी विभागाच्या कारवाई वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!