Join WhatsApp group

निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही — आमदार हरीश पिंपळे यांचा शासकीय कंत्राटधारकांना इशारा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर (दि.२७ जुलै २५):मुर्तीजापुर शहरातील स्टेशन विभाग परिसरात राम मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या पुलाच्या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. अग्रवाल नावाच्या ठेकेदाराने हे काम केले असून स्थानिक नागरिकांनी याबाबत नगरपरिषद व आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे तक्रार स्थानिक नागरिकांनी नोंदवली होती.

तक्रारीची गांभीर्याने दखल घेत आमदार पिंपळे यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली व कामाची पाहणी केली. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला निकृष्ट दर्जाचे बांधकाम पाडून पुन्हा नवीन व दर्जेदार पूल बांधण्याचे आदेश दिले.

यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार पिंपळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “माझ्या मतदारसंघात निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही. जर भविष्यात अशा प्रकारची कामे आढळल्यास ठेकेदारांचे लायसन्स रद्द करा असे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.”

त्यांच्या या भूमिकेचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात अशा निकृष्ट कामांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!