Join WhatsApp group

अराजकीय संस्थेवर राजकारणाचा डोळा…?कर्मचाऱ्यांच्या फितुरीने संस्थेचे बाजारीकरण; चेंबूर स्काऊट-गाईडमध्ये गंभीर प्रकार उघड

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुंबई : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित व अराजकीय संस्था असून धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत आहे. मात्र अलीकडील घडामोडी पाहता ही संस्था काही स्वार्थी कर्मचाऱ्यांच्या फितूरीमुळे बाजारात उतरल्याचा आरोप होत आहे.

विशेषतः चेंबूर जिल्हा स्काऊट-गाईड कार्यकारिणीत राजकीय हस्तक्षेपाचे स्पष्ट चिन्ह दिसून येत आहे. २०१९ पासून संस्थेवर प्रशासक नेमण्यात आला असून प्रत्येक जिल्हा कार्यकारिणीत फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांचीच नियुक्ती होणे अपेक्षित आहे.

पण चेंबूरमध्ये या नियमाला हरताळ फासून एका बड्या राजकीय पक्षाचे आमदार हे जिल्हाध्यक्षपदी विराजमान आहेत.

मनमानी कारभार आणि नियमांचे उल्लंघन:

चेंबूरच्या संघटकांकडून मनमानी कारभार केला जात असून सहाय्यक जिल्हा आयुक्त हेही पडद्यामागून राजकीय सूत्र हलवत असल्याचे दिसते. विद्यार्थ्यांच्या हक्काच्या जमिनीवर वैयक्तिक हितासाठी अवैध बांधकाम केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.अधिक धक्कादायक बाब म्हणजे — काही कर्मचारी “घरभाडे भत्ता (HRA)” घेत असून वास्तवात संस्थेच्या इमारतीतच राहतात, हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले गेले आहे.

दादरच्या पॅवेलियनवरही ‘आका’चा दावा:

दादर येथील शिवाजी पार्क लगत असलेल्या स्काऊट पॅवेलियनवर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपला मालकी हक्क गाजवत असल्याचा आरोप होत आहे. या व्यक्तीने स्वतःला स्काऊट चा “जनक लॉर्ड बेडन पॉवेल” यांचा वारसदार समजण्याचा भ्रम असल्यासारखी वर्तणूक दाखवली आहे, अशी टीका शिक्षक आणि स्काऊटर-गाईडर कडून केली जात आहे.

उपमुख्यमंत्र्यांकडून अडव्होक समितीची स्थापना:

संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संस्थेवर अॅडव्होक समिती नेमली आहे. मात्र, संबंधित ‘आका’ने क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांशी तसेच एका आमदाराशी साटेलोटे करून पुन्हा नव्या राजकीय खेळाची सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी:

या राजकारणाचा फटका थेट स्काऊट-गाईडर आणि विद्यार्थ्यांनाच बसत असून, या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घडामोडीकडे लक्ष देण्याची मागणी स्काऊट-गाईड शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

या प्रकारा विरोधात व्यंगचित्रकार बबलू यादव यांनी एक बोलके व्यंगचित्र काढून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!