Join WhatsApp group

पोलीस बनले देवदूत : अपघात ग्रस्ताची वाचवली अमूल्य जीवदान

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला (प्रतिनिधी) –दिनांक १० सप्टेंबर २५ :

काल रात्री भीमनगर कारंजा टी पॉइंटवर झालेल्या मोटरसायकल अपघातात गंभीर जखमी पडलेल्या इसमाचा जीव वाचविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता आदर्शवत ठरली आहे.

घटनेप्रमाणे, रात्री एक वाजताच्या सुमारास मोटरसायकल घसरून एका तरुणाचा अपघात झाला. तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होता. कानातून रक्त येत असतानाही सुमारे ३० ते ४० लोकांनी गर्दी केली होती, परंतु कोणालाच मदतीसाठी पुढे यायची हिंमत झाली नाही.यावेळी पोलीस कर्मचारी देवेश कडू (बीएम शेजव) घटनास्थळी पोहोचले.

“सर, इसकी जान बचाना है” असे शब्द उच्चारत त्यांनी परिस्थिती हाताळली. तातडीने सरकारी वाहन बोलावून चालक वैराळे यांच्या मदतीने जखमीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाने कोणताही आढेवेढा न घेता “गाडी साफसफाई करता येईल, पण प्राण परत येणार नाहीत; हा आमचा कर्तव्यभाव आहे” अशी भूमिका घेतली.

सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचारानंतर जखमीस पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, रुग्णाचे नातेवाईक भावुक होऊन “साहब, आपने हमारे आदमी की जान बचाई…” अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

या घटनेत पोलीस कर्मचारी देवेश कडू, शेजव व चालक वैराळे यांनी दाखविलेल्या तत्परते मुळे पोलिस दलाचा मानवतावादी चेहरा अधोरेखित झाला आहे.

पोलीस निरीक्षकांनी या तिघांची नावे वरिष्ठांकडे प्रशस्तीपत्रासाठी पाठविण्याचा प्रस्ताव ठेवला असून, त्यांचे नाव “हिरो ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द मंथ – २०२५” या बोर्डवर उमटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!