Join WhatsApp group

पोलीस प्रशासनाने दखल घेऊन असामाजिक तत्त्वावर वचक बसवावा- आमदार रणधीर सावरकर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक – २१ – अकोला – अकोला शहरामध्ये वाढत्या चोरी, घरपोडी अवैद्य धंदे, तसेच वीज वितरण कंपनीचे साहित्य चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असून यासंदर्भात पोलीस प्रशासनाने दखल घेऊन असामाजिक तत्त्वावर वचक बसवावा व कारवाई करावी असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.

अकोला शहरावर व जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे खंबे तार विविध साहित्य चोरी होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असून यासंदर्भात पोलीस प्रशासनाने शीघ्र गतीने अशा चोरी करणाऱ्या मुलींना जेरबंद करावे तसेच वाढत्या गुन्हेगारी वाढते अवैद्य धंदे तसेच वाढत्या घरफोडी यासंदर्भात एक पथक निर्माण करून जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी या संदर्भात कारवाई करावी व याबद्दल दक्षतेने लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेऊन अनेक विषयावर चर्चा करून कायदा सुव्यवस्था सोबत असामाजिक तत्त्वावर कारवाई करण्याच्या संदर्भात निर्देश दिले आहेत.

त्यावेळी त्यांच्यासोबत विजय अग्रवाल, राजेश बेले जयंत मसने किशोर पाटील, माधव मानकर अमित कावरे, अंबादास उमाळे गिरीश जोशी, एडवोकेट देव आशिष काकड, पंकज वाडी वाले विवेक भरणे संदीप गावंडे गणेश अंधारे गणेश सारसे, प्रवीण हगवणे, गणेश तायडे किशोर कुचके, विपुल घोगरे, रंजीत खेडकर, आधी आधी यावेळी होते
यावेळी राज्याचे ,मुख्यमंत्री व गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचा जून महिन्यामधील आठव दुसऱ्या आठवड्यात आगमन होत असून या संदर्भात कायदा सुव्यवस्था सोबत व सामाजिक तत्त्वावर तसेच अवैध धंद्यांवर व वाढत्या चोरीवर बसवण्याची निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले


Share

Leave a Comment

error: Content is protected !!