Join WhatsApp group

अकॅडेमिक हाइट्स पब्लिक स्कूल, मुर्तीजापूर येथे पालक-ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर : अकॅडेमिक हाइट्स पब्लिक स्कूल, मुर्तीजापूर येथे पालक-ओरिएंटेशन कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. शाळा, शिक्षक आणि पालक यांच्यातील समन्वय अधिक बळकट व्हावा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र दिशा मिळावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येच्या अधिष्ठात्री देवी, मा. सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली. हा कार्यक्रम दोन सत्रांत पार पडला.

पहिल्या सत्रात इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले. याचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. सुलक्षणा देशमुख मॅडम व श्री. देवांशू डवरे सर यांनी केले. दुसऱ्या सत्रात इयत्ता पहिली ते चौथीच्या पालकांसाठी समुपदेशन झाले, ज्याचे सूत्रसंचालन कु. प्राची टाले मॅडम व श्री. रोहन वैद्य सर यांनी आत्मविश्वासाने पार पाडले.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले शाळेचे आदरणीय प्राचार्य मा. श्री. खुशाल थानवी सर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन.

त्यांनी पालकांशी संवाद साधताना सांगितले की,> “आजचं शिक्षण एककेंद्री न राहता दुकेंद्री झाले आहे. शिक्षक व पालक हे दोघेही शिक्षणप्रक्रियेचे समतोल भागीदार आहेत. मात्र या प्रक्रियेचा केंद्रबिंदू विद्यार्थीच असायला हवा.”प्राचार्य थानवी सरांच्या विचारांनी उपस्थित पालकांना शिक्षणाबाबत नवा दृष्टिकोन दिला.

त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणांच्या पलीकडे – आत्मविश्वास, संवादकौशल्य, मूल्यसंस्कार, जबाबदारी व भावनिक समतोल यांचा विकास हाच खरा शिक्षणाचा गाभा असल्याचे अधोरेखित केले.पालकांनीही या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

ते फक्त श्रोते न राहता सक्रिय सहभाग घेऊन प्रश्न विचारले, अनुभव शेअर केले. अनेकांनी हा कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थाने ‘पालकत्वाचा आरसा’ ठरल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरणात झाली.

पालकांनी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त करत शाळेच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!