Join WhatsApp group

“पंचगव्हाणचा गब्बर” अजूनही फरार; अकोल्याच्या पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नजरेत जय-वीरू कोण ठरेल?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला| जयप्रकाश मिश्रा |दिनांक २४ जुलै २५

रामगडचा गब्बर दरोडेखोर होता, पण पंचगव्हाणचा गब्बर जमादार ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या!”शोले” चित्रपटात गब्बरला पकडण्यासाठी ठाकूरने जय-वीरूला पाचारण केलं होतं.

आज तसाच प्रसंग जिल्हा पोलिस विभागासमोर उभा आहे –

पंचगव्हाणच्या गब्बरला पकडण्यासाठी अकोल्याचा जय-वीरू कोण असेल, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

१७ जुलै रोजी खदान पोलिस ठाण्याला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर मातृभूमी प्रेस परिसरात टाकलेल्या छाप्यात एमडी ड्रग्जच्या तस्करीप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.

मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ (फिरदौस कॉलनी) आणि मुस्ताक खान हदीक खान (गफुरवाला प्लॉट, अकोट). त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपये किमतीचे ४६.३० ग्रॅम एमडी, ३.५० लाख रुपये किमतीची दुचाकी, मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

चौकशीत मोठा धक्का देणारी माहिती उघडकीस आली – या प्रकरणामागे मुख्य सूत्रधार “गब्बर जमादार”, पंचगव्हाण येथील एक संशयित आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, गेल्या सात दिवसांपासून एलसीबी आणि स्थानिक पोलिसांनी शोध मोहिम राबवली आहे, मात्र गब्बर पोलिसांना चकमा देत आहे.

राजकीय आश्रयाचा प्रभाव?

सूत्रांनुसार, गब्बरचे काही राजकीय नेत्यांशी संबंध असून, त्याचा एक पोलिस मित्रही त्याच्या मदतीला धावून आल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी आखलेल्या युक्त्या त्याच्यापर्यंत आधीच पोहोचत आहेत. मात्र, त्याचे नाव समोर आल्यानंतर संबंधित राजकीय पक्षाने त्याच्याशी असलेले संबंध झटकले आहेत, त्यामुळे त्याला सध्या कोणतीही राजकीय ढाल मिळत नाही.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची कसोटी

या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. ‘गब्बरला पकडणं केवळ कठीण नाही, तर अशक्य आहे’ – हे म्हणणं सत्य ठरवायचं की नाही, हे आता अकोल्याच्या ‘जय-वीरू’वर अवलंबून आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!