Join WhatsApp group

“हमारा बजाज, हमारा गुटखा” – मुर्तिजापुरात गुटखा माफियाचा दबदबा?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : दि. २५ जुलै –“हमारा बजाज, हमारा गुटखा” अशा शब्दांत सध्या मुर्तिजापुर शहरात बजाज नावाच्या एका व्यक्तीची ओळख गुटखा किंग म्हणून होत असल्याची चर्चा आहे. माना पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात या व्यक्तीविरोधात काही दिवसांपूर्वी गुन्हाही दाखल झाल्याची माहिती आहे.

शहरात व तालुक्यात खुलेआम गुटख्याचा व्यवसाय सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पान टपऱ्या, किराणा दुकाने आणि स्टेशन परिसरात सर्रासपणे गुटख्याची विक्री होत असून, हा गुटखा गोळ्या-बिस्किटांसारखा खुलेआम विक्रीस ठेवला जातो. दिवसाढवळ्या गुटख्याची टपऱ्यांवर लटकवून विक्री केली जात असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

विशेषतः सिद्धार्थ नगर, स्टेशन परिसर व सिंधी कॉलनी भागांमध्ये गुटख्याचा खुलेआम व्यवहार करून गुटख्याची गाडी दररोज खाली होत असून सर्रासपणे या भागांमध्ये असल्याची माहिती मिळत आहे.

या व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या गाड्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने, संबंधित यंत्रणांकडून याला मूक संमती मिळतेय का, असा सवाल उपस्थित होतो.

या गुटख्याच्या पाकिटांवर उत्पादन तारीख, वापरण्याची अंतिम तारीख, कंपनीचा पत्ता यासारख्या आवश्यक माहितीचा अभाव असल्याने हा गुटखा नियमबाह्य आहे की काय, याचीही शंका उपस्थित होत आहे. काही नागरिकांच्या मते, हा गुटखा बनावट असून तरुणांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.

अन्न व औषध प्रशासन, तसेच अन्य संबंधित विभाग यावर कोणतीही ठोस कारवाई का करत नाहीत?गुटखा विक्रीवर बंदी असताना, तो इतक्या उघडपणे कसा विकला जातो?हे प्रश्न सध्या शहरातील नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

नागरिकांची मागणी : संबंधित प्रशासनाने या गुटखा माफियांवर त्वरित कारवाई करावी आणि जनतेच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ थांबवावा, अशी मागणी जनतेकडून होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!