Join WhatsApp group

विद्यार्थ्यांसाठी खुले ज्ञानदालन : संत गजानन महाराज अभ्यासिका व मोफत वाचनालयाचे उत्साहात उद्घाटन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर: दिनांक १८: स्वर्गीय मारोती आप्पा विठ्ठल आप्पा पिंपळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री संत गजानन महाराज अभ्यासिका व मोफत वाचनालयाचे उद्घाटन विद्याविहार विद्यालय, शेंदूरजना बाजार येथील शाळा प्रांगणात उत्साहात पार पडले.

हा उपक्रम आमदार हरीष मारोती आप्पा पिंपळे यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून साकारण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यात वाचनाची व पुस्तकांची आवड निर्माण व्हावी, तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक सुसज्ज व खुले दालन उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने या अभ्यासिकेची निर्मिती करण्यात आली आहे.

या उद्घाटन सोहळ्यास श्रीमती दुर्गाताई मारोती आप्पा पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. उद्घाटक म्हणून दुर्गाताई मारोती आप्पा पिंपळे, तर अध्यक्ष म्हणून रोहन हरीष पिंपळे (अध्यक्ष, श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था, मूर्तिजापूर) उपस्थित होते.कार्यक्रमास सौ. नूतन हरीष पिंपळे (कोषाध्यक्ष), संतोष श्रीकृष्ण भांडे (सचिव, श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था, मूर्तिजापूर), नरेंद्र दिनकरराव ठाकूर (सचिव, मस्तराम बाबा शिक्षण संस्था, तळेगाव ठाकूर) यांच्यासह पवन कुकडे, प्रज्वल भुजाडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

अभ्यासिका निर्मितीसाठी श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या संचालक मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.विद्याविहार विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल अशोक भारती यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी ग्रंथालय व अभ्यासिकेचे महत्त्व विशद करून संस्थेचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक ऋत्विक पांडव यांनी केले.

यावेळी स्वर्गीय मारोती आप्पा विठ्ठल आप्पा पिंपळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या अभ्यासिकेच्या उद्घाटनामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना व वाचकांना मोठा लाभ होणार असून अभ्यासासाठी एक सुसज्ज व खुले दालन उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाचा समारोप ‘वंदे मातरम्’ गीताने करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षक शरद पवार, प्रीती मोहोड, रविराज खरोडे, ऋत्विक पांडव, कौशल गोंडचर, गजानन शितळे व श्रावण बनकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!