Join WhatsApp group

मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुर्तीजापुर भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच विविध कामाचे आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते उद्घाटन

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मुर्तिजापूर शहर व ग्रामीण मंडळ, गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था मुर्तिजापूर, मुख्यमंत्री सहायता निधी धर्मादाय मदत कक्ष अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम दुर्गा माता मंदिर लकडगंज मुर्तीजापुर येथे संपन्न झाला. या प्रसंगी रुग्णालयात आधुनिक आरोग्य सुविधांचे उद्घाटन, सोनोग्राफी मशीन, स्वच्छ पाण्यासाठी आरो मशीन,हायमास्ट लाईट, आणि इतर विविध उपक्रमांचा शुभारंभ आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे आमदार हरीश पिंपळे यांनी स्वतः रक्त देऊन रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.

कार्यक्रमाला भाजपाचे तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेकडो रक्तदात्यांनी सहभाग घेतल्याने रक्तदान शिबिर अत्यंत यशस्वी ठरले.

या प्रसंगी बोलताना आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले की,

“संपूर्ण महाराष्ट्रात ऐतिहासिक रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले आहे. हे शिबिर ‘गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवले जाणार आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर आजवर महाराष्ट्रात एकाच वेळी एकाच दिवशी रक्तदान झालेले नाही. वेळेवर रक्त मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचू शकतात. ही संकल्पना प्रचाराच्या गाजावाजाविना, बॅनर न लावता राबवण्यात आली आहे.”


Share

Leave a Comment

error: Content is protected !!