Join WhatsApp group

उद्घाटनाचा पहिल्याचा दिवशी ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्ज्याचा कामाचे पितळ उघड! तिकीट घराच्या मुख्य दारात पाण्याच्या गळतीने प्रवाशांचे स्वागत…नव्याने बांधलेल्या मुर्तिजापूर रेल्वे स्थानकाची अवस्था दयनीय अवस्था.

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर – २३ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कालच दूरदृश्य प्रणालीद्वारे अमृत भारत रेल्वे स्थानक योजना अंतर्गत पुन्हा विकासित करण्यात आलेल्या मुर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा उद्घाटन सोहळा पार पडला. एकीकडे डौलदार सजावट, आकर्षक रंगरंगोटी, नव्या सुविधा… आणि दुसरीकडे, अवकाळी पावसात तिकीट घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून गळणारे पाणी!…नव्याने उभारलेल्या या इमारतीच्या बांधकामाची निकृष्ट गुणवत्ता अवकाळी पावसाने चव्हाट्यावर आणली आहे. काल रात्रीच्या पावसात स्थानकाच्या मुख्य दारातून अक्षरशः पाणी वाहत होते. प्रवाशांच्या छत्रीऐवजी थेट इमारतीतूनच पावसाचे थेंब त्यांचे “स्वागत” करत होते…. “इतक्या मोठ्या योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली इमारत एका पावसातच गळायला लागते, तर जबाबदार कोण?

” स्थानिकांचे म्हणणे आहे की ठेकेदारांनी केवळ तात्पुरत्या सजावटीतच लक्ष घातले, तर रेल्वेचे अधिकारी संपूर्ण बाबीकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसते. रेल्वे प्रशासन आता या घटनेची दखल घेणार का? संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का? की नेहमीप्रमाणे ‘गेल्या प्रकाराची चौकशी सुरू आहे’ इतक्यावरच विषय थांबणार? या योजनेतून स्थानकांचा कायापालट झाला, पण “ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचाही कायापालट झाला का?” असा प्रश्न प्रवाशांच्या आणि स्थानिकांच्या तोंडी आहे.. आता बघावे लागेल की रेल्वे प्रशासन या लाजीरवाण्या प्रकाराची गंभीर दखल घेते की नाही…


Share

Leave a Comment

error: Content is protected !!