Join WhatsApp group

“नो हॉकर्स झोन”चे फलक बारा तासाच्या आत हटवले. अतिक्रमणधारकांकडून थेट निषेधाची भूमिका!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर – (दि. २४)शहरात “नो हॉकर्स झोन” म्हणून जाहीर केलेल्या ठिकाणी लावण्यात आलेले फलक अतिक्रमणधारकांनी बारा तासातच हटवून निषेध नोंदवला आहे.

कोणताही विचार न करता, प्रशासनाच्या आदेशाला थेट आव्हान देत फलक पाडण्यात आले असून, यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.नगरपरिषदेकडून शहरातील वाहतूक व नागरी सुविधा सुरळीत राहाव्यात यासाठी हा निर्णय घेतला होता.

मात्र, फेरीवाले व अतिक्रमणधारकांनी या निर्णयाला सरळसरळ विरोध दर्शवत दुसऱ्याच दिवशी कारवाईसारख्या फलकांनाच लक्ष्य केल्याने प्रशासकीय निर्णयांची खिल्ली उडाल्याचे चित्र दिसत आहे.

या प्रकारामुळे शहरातील जनतेचे लक्ष आता नगरपालिका काय पाऊल उचलते याकडे लागले आहे.

केवळ बोर्ड लावून जबाबदारी पार पडली, की खर्‍या अर्थाने अंमलबजावणीस प्रारंभ होणार? हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

नगरपालिकेकडून याप्रकरणी कोणती भूमिका घेण्यात येते, अतिक्रमणधारकांवर कारवाई होते का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!