Join WhatsApp group

NMMS शिष्यवृत्ती निवड प्रकाशवाट प्रकल्प मार्फत यशस्वीरित्या संपन्न.

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर | 20 जुलै 2025, रविवार

प्रकाशवाट प्रकल्पाची बहुप्रतिक्षित NMMS (सुपर 50) शिष्यवृत्ती निवड चाचणी आज उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

तालुक्यातील 230 विद्यार्थ्यांनी या निवड चाचणीत सहभाग घेत सुपर 50 मध्ये निवड होण्यासाठी आपली तयारी दर्शवली.

🟠 ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण

शिक्षणाच्या व्यापारीकरणाच्या काळात न्या. अनिल किलोर यांच्या संकल्पनेतून साकारलेला प्रकाशवाट प्रकल्प हा ग्रामीण भागातील गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी शिक्षणातील एक उज्वल संधी ठरत आहे. मा. आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनात, तालुका शिक्षण समन्वय समिती व शिक्षण विभाग मूर्तिजापूर यांच्या सहकार्याने हे कार्य गतवर्षीपासून सुरू आहे.

🟠 रविवारीही अपूर्व प्रतिसाद

सुटीच्या दिवशी देखील ही चाचणी घेण्यात आली असून, सकाळी ११ ते १ दरम्यान ९ वर्ग खोल्यांमध्ये परीक्षा शांततेत पार पडली.गटसाधन केंद्रातील कर्मचारी, शिक्षण विस्तार अधिकारी मा. सुषमा लांडे मॅडम व गटसमन्वयक कैलास सोळंके सर यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहून व्यवस्थापनात सहभाग दिला. सेंट ऑन्स विद्यालयाचे फादर देखील उपस्थित राहून प्रकल्पाच्या कार्याची प्रशंसा केली.

🟠 गुणानुक्रमे 50 विद्यार्थ्यांची निवड

या चाचणीतून निवडलेल्या 50 विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत मार्गदर्शन व शिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये –

✅ आ. हरीश पिंपळे यांच्या गजानन बहुद्देशीय संस्थेमार्फत शैक्षणिक किट व गणवेश

✅ दानशूर व्यक्तींच्या मदतीने दररोज नाश्ता आणि प्रशांत हजारी यांच्याकडून दूध वाटप करण्यात येत आहे.

✅ उत्कृष्ट मार्गदर्शकांकडून मुख्य परीक्षेसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

✅ NMMS शिष्यवृत्ती (रु. 48,000) मिळवण्यासाठी विशेष तयारीमागील वर्षी प्रकल्पातील 14 विद्यार्थी NMMS शिष्यवृत्ती पात्र ठरले होते. यावर्षी हे यश द्विगुणित करण्यासाठी संपूर्ण टीम सज्ज आहे.

🟢 प्रकाशवाट प्रकल्पाचे आवाहन

या समाजोपयोगी कार्यात दानशूर व्यक्तींनी “फूल नाही, फुलाची पाकळी” स्वरूपात मदत करावी असे आवाहन प्रकल्पाच्या वतीने करण्यात आले आहे.

🌟 या चाचणीच्या यशस्वी आयोजनामागे कार्यरत संपूर्ण प्रकाशवाट टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!