Join WhatsApp group

नवीन रीवा -पुणे साप्ताहिक एक्स्प्रेसला अकोल्यात थांबा नाही, प्रवाश्यांची तीव्र नाराजी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला ३१ मे २०२५: रेल्वे बोर्डाने नवीन २०१५२/५१ रीवा -पुणे साप्ताहिक एक्स्प्रेसला मंजुरी दिली आहे, परंतु तिच्या प्रस्तावित मार्गामुळे अकोल्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

अकोला जंक्शनसारख्या मोठ्या महसूल मिळवून देणाऱ्या स्थानकावरून ही गाडी धावणार असली तरी, तिला येथे थांबा दिला जाणार नसल्याने स्थानिक प्रवासी, व्यावसायिक आणि रेल्वे संघटनांकडून थांबा देण्याची मागणी जोर धरत आहे.दिनांक २९ मे २०२५ रोजी जारी केलेल्या रेल्वे बोर्डाच्या पत्र CC-93/2025 नुसार, नवीन रीवा -पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस गोंदिया, नागपूर, भुसावळ आणि मनमाड मार्गे धावेल. या मार्गावरील वर्धा आणि कोपरगावसारख्या इतर स्थानकांवर थांबे निश्चित केले असले तरी, महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या अकोला जंक्शनला वगळण्यात आले आहे.२०१५२ रीवा -पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस दर बुधवारी रीवा येथून सकाळी ०६:४५ वाजता सुटेल आणि गुरुवारी सकाळी ०९:४५ वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी रात्री २२:३० ते २३:०० दरम्यान अकोल्यातून जाण्याची शक्यता आहे.

परतीच्या दिशेने, २०१५१ पुणे-रीवा साप्ताहिक एक्स्प्रेस गुरुवारी दुपारी १५:१५ वाजता पुण्याहून सुटेल आणि शुक्रवारी १७:३० वाजता रीवा ला पोहोचेल, जी मध्यरात्री ००:२५ ते ०१:०० दरम्यान अकोल्यातून जाण्याची शक्यता आहे.

अकोल्याला थांबा का हवा?

जबलपूर करिता थेट रेल्वे कनेक्शन: ही रेल्वे अकोल्याला जबलपूरशी थेट जोडेल, ज्यामुळे उत्तर प्रदेशातील प्रयागराज, कानपूर, अयोध्या यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक आणि व्यावसायिक केंद्रांसाठी प्रवेशद्वार खुले होईल.

सध्या अकोल्याहून या ठिकाणांना एकही थेट रेल्वे नाही.- रेल्वे उत्पन्नाचे नुकसान: अकोला हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून, येथे थांबा न देणे हे रेल्वेच्या उत्पन्नाचे नुकसान होईल.

स्थानिक नागरिक आणि रेल्वे यात्री एकता मजदूर संघ रेल्वे मंत्र्यांना अकोला जंक्शनवर या नवीन एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणी करत आहेत. अकोल्याचे महसूल-उत्पन्न करणारे स्थानक म्हणून महत्त्व आणि यामुळे मिळणारी महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी यावर जोर देण्यात येत आहेत.

जबलपूर आणि रीवा साठी प्रस्तावित मार्गा स्थानकांवरून सध्याच्या रेल्वे सेवा पाहता, अकोल्याला थांबा नसणे विशेषतः आश्चर्यकारक आहे.- भुसावळ येथून सध्या जबलपूरसाठी ५९ आणि रीवा साठी ३ ट्रेन- नागपूर येथून जबलपूरसाठी १९ आणि रीवा साठी २ ट्रेन- वर्धा/सेवाग्राम येथून ७ ट्रेन- पुणे/कोपरगाव येथून जबलपूरसाठी ८ ट्रेन- अमरावती येथून १ ट्रेन


Share

Leave a Comment

error: Content is protected !!