Join WhatsApp group

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय हेंडज कॉलेजला दिवंगत नेते तुकाराम भाऊ बिडकर यांचे नाव द्यावे – राष्ट्रवादी अजित पवार गट ची मागणी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक : १५ : मूर्तिजापुर तालुक्यात दिवंगत नेते तुकाराम भाऊ बिडकर यांच्या प्रयत्नाने अनेक विकास कामे पार पडली.

सन 2004 ते 2009 पर्यंत 900 कोटींचे कामे तुकाराम भाऊ बिडकर यांनी मुर्तीजापुर तालुक्यासाठी आणले होते. त्यामध्ये विशेष म्हणजे मुर्तीजापुर तालुक्यात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, हेंडज. तुकाराम भाऊ बिडकर यांच्या पुढाकाराने व विशेष प्रयत्नाने हे कॉलेज मूर्तिजापूर तालुक्याला आज लाभले आहे.

आज अजित पवार स्वर्गीय तुकाराम भाऊ बिडकर यांच्या घरी भेट देण्याकरिता आले होते तेव्हा या कॉलेजला स्वर्गीय तुकाराम भाऊ बिडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्यावतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.

यावेळेस तालुका अध्यक्ष जगदीश मारोटकर सिद्धार्थ तायडे प्रदेश उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सरवर बेग अल्पसंख्यांक प्रदेश सचिव अमोल लोकरे शहराध्यक्ष भाग्यश्री गावंडे वर्षाताई महाकाळ जिल्हा उपाध्यक्ष महिला जितेंद्र नागोलकर निरंजन काळेकर भास्करराव फुके धनु आशिष नीलकंठ जगदीश तायडे सुरेंद्र मेहरे काँग्रेसचे संपूर्ण पदाधिकारी या वेळेस हजर होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!