Join WhatsApp group

मुर्तीजापूरकरांनो, बाप्पाचे विसर्जन पर्यावरण पूरक करा – निसर्ग वाचवा, जलस्रोत जपा!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर : दिनांक ०६ सप्टेंबर २५ :

निसर्गाचे रक्षण आणि भावी पिढ्यांसाठी शुद्ध जलस्रोत जपणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. वाढते जलप्रदूषण आणि पाण्याची कमतरते चा ग्रहण कित्येक वर्षापासून मुर्तीजापुर तालुक्याला लागला आहे. यामध्ये गणपती विसर्जन सुद्धा एक तांत्रिक मुद्दा आहे. आज गणपती बाप्पाचे विसर्जन असून पर्यावरण व जलस्त्रोत जपण्याची आज खरी वेळ आहे.

मुर्तीजापूरात गेली १४ वर्षे पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची परंपरा जोपासली जात आहे.

मुर्तीजापूर स्वच्छ भारत अभियान संस्था आणि नगरपरिषद मुर्तीजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला असून, यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विसर्जन कुंडांची विशेष सोय करण्यात आली आहे.

तालुक्यातील विविध नदींचे शुद्ध जल आणून, त्यात पवित्र गंगाजल मिसळून विशेष पूरक पवित्र कुंड तयार करण्यात आले आहेत.

या कुंडामध्येच गणेशमूर्तींचे विसर्जन करून नागरिकांनी पर्यावरणाचा समतोल राखावा, असे स्पष्ट आवाहन स्वच्छ भारत अभियान संस्था व नगरपरिषद मुर्तीजापूर यांनी केले आहे.

पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्लास्टर ऑफ पॅरिस व रासायनिक रंग यामुळे नद्या आणि विहिरींमध्ये गंभीर प्रदूषण वाढते. ते टाळण्यासाठी ही पर्यावरणपूरक सोय करण्यात आली आहे. विसर्जना नंतर निर्जन स्थळी गड्डा करून विधिपूर्वक पूजा करून बाप्पाला निरोप प्रत्येक वर्षी या संस्थेकडून स्वखर्चातून करण्यात येते.

हा उपक्रम नागरिकांच्या सक्रीय सहभागामुळे अधिक प्रभावी ठरत असून, “आपले बाप्पा – आपली जबाबदारी, पर्यावरण रक्षण हीच खरी भक्ती” हा संदेश देत आहे.

👉 मुर्तीजापूरकरांनो, बाप्पाचे विसर्जन छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारलेल्या कुंडातच करा – निसर्ग वाचवा, जलस्रोत जपा!

असे आवाहन मुर्तीजापुर स्वच्छ भारत अभियान व नगरपरिषदेने केले आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!