Join WhatsApp group

मूर्तिजापूर : विशिष्ट व्यापारी समाजाची तरुणाई गांजाच्या आहारी; शहराच्या भवितव्यावर काळे ढग

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर : दिनांक १४ : मूर्तिजापूर शहरात गांजाचे व्यसन झपाट्याने वाढत असून यामध्ये विशेषतः विशिष्ट व्यापारी समाजातील तरुणाई मोठ्या प्रमाणावर ओढली जात असल्याचे समोर आले आहे. पैशांची उपलब्धता, दिखावा आणि मैत्रीच्या आडून होणारा संपर्क यामुळे गांजा पॅडलरना या समाजातील तरुणांना जाळ्यात ओढणे सोपे जात आहे.

गांजा पॅडलर यांनी नियोजनपूर्वक नेटवर्क उभारले असून हिरपूर रोड, एमआयडीसी परिसर, सोनोरी रोड व शहरातील काही लेआउट मध्ये रात्री अंधाराचा फायदा घेत विशिष्ट व्यापारी समाजातील तरुण गांजाच्या नशेत गुंग असल्याचे चित्र दररोज दिसत आहे.

सामाजिक जाणकारांच्या मते, या समाजातील तरुणाई व्यसनाच्या गर्तेत अडकत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. आज नश्यात असलेली ही पिढी उद्या व्यापार आणि समाजाचे भविष्य उद्ध्वस्त करू शकते. जर हे असेच चालू राहिले तर या समाजातील अनेक व्यापारी कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गांजाच्या नशे मुळे गुन्हेगारी वाढण्याचा धोका अटळ आहे. व्यापारातून आलेली संपन्नता जर व्यसनाच्या आहारी गेली, तर त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होणार आहे. फक्त या विशिष्ट व्यापारी समाजावरच नव्हे तर शहराच्या एकूण सामाजिक व आर्थिक रचनेवरही याचा दुष्परिणाम होणार आहे.

पोलिस प्रशासनाने गांजा तस्करांविरोधात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच पालक, शिक्षक, सामाजिक संस्था यांनी पुढे येऊन या व्यापारी समाजाच्या तरुणाईला व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!