Join WhatsApp group

मूर्तिजापूर नगरपरिषदेच्या अतिक्रमण कारवाईत अपंग व्यक्तीचा संसार उद्ध्वस्त; नागरिकांमध्ये संतापाचा सूर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मूर्तिजापूर | १६ जुलै २०२५

आज मूर्तिजापूर नगरपरिषदेने शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी मोठी कारवाई केली. मात्र, या कारवाईमध्ये शहानिशा न करता घेतलेल्या निर्णयामुळे एका अपंग व्यक्तीचा संसार उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मोहन साखरकर, राहणार स्टेशन विभाग, मरी माता मंदिराजवळ, मूर्तिजापूर — हे एक अपंग व्यक्ती असून शिवाजी चौकात एका टपरीतून छोटासा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी आज दुकान उघडले नव्हते. मात्र, नगरपरिषदेच्या जेसीबीने कोणतीही नोटीस किंवा शहानिशा न करता त्यांची टपरी तोडली. त्यामुळे एका अपंग व्यक्तीवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

oplus_8388640

साखरकर यांच्या या टपरीच्या माध्यमातून त्यांचे गटाचे हप्ते, मुलांचे शिक्षण व घरखर्च भागवला जात होता. आता या कारवाईमुळे ते पूर्णपणे उघड्यावर आले असून कुटुंब चालवण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

नागरिकांनी नगरपरिषदेच्या या ‘फक्त दाखवण्यासाठी’ केल्या गेलेल्या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “अपंग व्यक्तीचा विचार न करता, न समजता, केवळ आकड्यांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने क्रूर निर्णय घेतला आहे,” असा आरोप नागरिक करत आहेत.

शहरातील जनतेत यामुळे तीव्र नाराजी पसरली असून प्रश्न विचारला जात आहे की — आता मूर्तिजापूर नगरपरिषद अजून किती अपंगांचे पोट पायाखाली तुडवणार? अजून किती गरिबांचे संसार उध्वस्त करणार? असे प्रश्न शहरातील नागरिक विचारात आहे


Share

Leave a Comment

error: Content is protected !!