Join WhatsApp group

मुर्तिजापूर नगर परिषद निवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर | १९ : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सर्व सोयीसुविधांसह सज्ज करण्यात आली आहे.

नगर परिषदेमधील एकूण १२ प्रभाग व नगराध्यक्ष पदासाठी मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार असून, यासाठी ९२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी एकूण ६ टेबल ठेवण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय मतमोजणी सहा टेबलांवर पार पडणार असून, १२ फेऱ्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. प्रत्येक फेरीत एका प्रभागाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

सदस्य पदासोबतच नगराध्यक्ष पदाची मतमोजणी प्रक्रिया फेरीनिहाय सुरू ठेवण्यात येणार असून, १२ फेऱ्यांनंतर नगराध्यक्ष पदाचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. ज्या प्रभागाची मतमोजणी सुरू असेल, त्या प्रभागातील अधिकृत मतमोजणी प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

मा. जिल्हाधिकारी, अकोला यांच्या आदेशानुसार मतमोजणी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मतमोजणी प्रक्रियेसाठी ६ मतमोजणी पर्यवेक्षक, ६ सहाय्यक व ४ राखीव अधिकारी-कर्मचारी, असे एकूण १६ कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिली. ही माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जाधव यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होणार असून, माहिती व प्रसारणाच्या दृष्टीने स्वतंत्र मीडिया कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षामध्ये सर्व पत्रकार बंधूंसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे व पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी दिली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!