Join WhatsApp group

मुंबई – पावसाळी अधिवेशन २०२५शालेय शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर आमदार हरिष पिंपळे यांचा जोरदार आवाज!

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आज शालेय शिक्षण विभागातील गंभीर भ्रष्टाचाराचा मुद्दा मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. हरिष पिंपळे यांनी जोरदारपणे उपस्थित केला. अल्पसंख्यांक दर्जा देण्याच्या प्रक्रियेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांवर त्यांनी विधानसभेत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली.

या मुद्द्याला अधिक गती देताना मा. प्रवीण तायडे यांनी एका धक्कादायक प्रकाराचा खुलासा केला. त्यांच्या मते, काही खासगी शाळांनी पात्रतेअभावीही अल्पसंख्यांक दर्जा मिळवण्यासाठी लाखो रुपयांची लाच दिली. यामध्ये काही शाळांनी तब्बल १० लाख रुपयांची रक्कम दिल्याचे उघड झाले आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार पिंपळे यांनी खालील तीन महत्त्वाच्या मागण्या सभागृहात मांडल्या :

1. अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त शाळांची सखोल चौकशी करून अपात्र शाळांचा दर्जा तात्काळ रद्द करावा.

2. सध्या सुरू असलेल्या SIT (विशेष तपास पथक) चौकशीला निश्चित कालमर्यादा द्यावी व अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत.

3. SIT चा अहवाल आल्यानंतर एका महिन्यात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार का, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी.

या गंभीर प्रकारामुळे शिक्षण विभागातील कार्यपद्धती, पारदर्शकता आणि शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याची प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आमदार पिंपळे यांच्या ठाम भूमिकेमुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात येईल, अशी ग्वाही शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली असून, चौकशीला गती देण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

> शिक्षणात भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही – आमदार हरिष पिंपळे


Share

Leave a Comment

error: Content is protected !!