Join WhatsApp group

अल्पवयीन विद्यार्थीनीवर मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच सामुहिक अत्याचार; व्हिडिओही व्हायरल केला, नराधम अटकेत

Photo of author

By Sarkarmzanews

Share

लखनऊ : उत्तप्रदेशातील एका अल्पवयीन दलित विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तरप्रदेशच्या मोरादाबाद येथील शाळेत १२ वर्षीय विद्यार्थीनीवर मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या दुष्कृत्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल देखील करण्यात आला आहे. विद्यार्थीनीच्या शेजारणीने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर घटना उघडकीस आली आहे.

वृत्तानुसार, ही घटना ८ मे ला मोरादाबादमधील शाळेत घडली होती. नराधमांनी त्या पीडित मुलीला सॉफ्ट ड्रिंक मधून ड्रग्स सारखी गुंगीचे द्रव दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. या दुष्कृत्याचा व्हिडिओही बनवला. हा व्हिडिओ जेव्हा समाजमाध्यमांवर व्हायरल झाला, तेव्हा विद्यार्थीनीच्या शेजारणीने हा व्हिडिओ पाहिला आणि तिच्या आईला सोमवारी १९ मे ला याबद्दल सांगितले. आईने ताबडतोब पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. मंगळवारी सायंकाळी पाचही आरोपींना अटक करण्यात आली.

पीडिल मुलीने पोलिसांना सांगितले की, तिचे शेजारी आणि स्थानिक शाळेतील विद्यार्थी असलेल्या मुलांनी तिला काहीतरी विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी तिला जवळच्या ज्युनियर हायस्कूलमध्ये नेले. त्यापैकी एकाने त्याच्या वडिलांकडून आणि शाळेच्या चौकीदाराकडून चोरलेल्या चावीचा वापर करून शाळेच्या इमारतीत प्रवेश केला. तिला आत नेले आणि त्यांनी गेट बंद केले. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या कार्यालयात नेले आणि तिला मादक पेय पाजले. ‘मी बेशुद्ध पडल्यावर त्यांनी माझ्यावर बलात्कार केला आणि ते सर्व रेकॉर्ड केले,’ एवढेच नाही तर तिच्या पालकांना जर तिने याबद्दल बोलले तर त्या नराधमांनी तिला मारण्याचीही धमकी दिली होती.

पीडितेच्या आईने सांगितले की, ‘माझी मुलगी अनेक दिवसांपासून नैराश्यात होती, पण मी व्हिडिओ पाहण्याआधी तिने मला काहीही सांगितले नाही.’ या घटनेनंतर परिसरातील सारेच हादरले आहेत. पाचही आरोपी अल्पवयीन असून त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!