Join WhatsApp group

मुर्तिजापूरमध्ये उसणे पैसे परत मागितल्यावर मारहाण – आरोपीवर गुन्हा दाखल

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर : दिनांक १२ सप्टेंबर २५ :शहरातील प्रजापती लेआउट परिसरात उसणे दिलेले पैसे परत मागितल्यावरून झालेल्या वादात एका महिलेला लोखंडी कड्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

फिर्यादी योगीता गजानन सोनटक्के (वय 40, व्यवसाय – मजुरी, रा. प्रजापती लेआउट, जुनीवस्ती, मुर्तिजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 11 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8.20 वाजता आरोपी अमोल अरुणराव चेडे (वय 40, रा. नवीन घरकुल, जुनीवस्ती, मुर्तिजापूर) हा त्यांच्या घरासमोर आला. त्याने उसने दिलेले 10 हजार रुपये परत मागितले.

मात्र फिर्यादींकडे त्यावेळी पैसे उपलब्ध नसल्याने त्यांनी “सध्या पैसे नाहीत, नंतर देऊ” असे सांगितले.यामुळे संतापलेल्या आरोपीने शिवीगाळ करत हातातील लोखंडी कड्याने फिर्यादीच्या कपाळावर मारहाण केली. यात फिर्यादी गंभीर जखमी होऊन त्यांच्या कपाळावरून रक्तस्राव झाला.या घटनेवरून मुर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात अप क्रमांक 413/2025 कलम 118(1), 352, 351(2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोपीचा यापूर्वीही अप क्रमांक 157/2015 कलम 279, 304 (अ) आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.सदर प्रकरणाचा तपास PSI आशिष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!