Join WhatsApp group

“ऑपरेशन प्रहार” अंतर्गत पातुर पोलिसांची मोठी कारवाई!म्हैसांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर जप्त — ५१ म्हशींसह ४८ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला, दि. ८ नोव्हेंबर — अकोला जिल्ह्यातील “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत पातुर पोलिसांनी मोठी कारवाई करत म्हैसांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला आहे. या कारवाईत एकूण ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवली जात आहे. त्याच अनुषंगाने, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी पातुर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, एका कंटेनरमध्ये दाटीवाटीने बांधलेल्या म्हशींची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे.

त्यानुसार सावरखेड टोल नाक्यावर नाकाबंदी करण्यात आली. त्या ठिकाणी संशयित कंटेनर क्रमांक एचआर-७३ बी-००५६ येताच पोलिसांनी तो थांबवून तपास केला असता, त्यात ५१ म्हशी दोरीने बांधून कोणतीही सुविधा न देता नेण्यात येत असल्याचे आढळून आले.

चालकाची ओळख नासीर खान जुबेर खान (वय २३, रा. घासेरा, ता. नुह, राज्य हरियाणा) अशी झाली. पोलिसांनी तत्काळ कंटेनर जप्त करून त्यातील जनावरे सुरक्षित स्थळी हलवली.
या कारवाईत ५१ म्हशी किंमत ८ लाख रुपये आणि कंटेनर किंमत ४० लाख रुपये असा एकूण ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी चालकाविरुद्ध पातुर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड, पो. हे. कॉ. मनोज ठाकुर (ब. नं. १३९३), पो. कॉ. नदिम (ब. नं. २३७५) आणि चालक पो. हे. कॉ. ठाकरे (ब. नं. २०१) यांनी संयुक्तपणे केली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!