Join WhatsApp group

शहर कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई: ६ किलो गांजासह आरोपी अटकेत

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – अकोल्यातील शहर कोतवाली पोलिसांनी लक्ष्मी नगर परिसरातील एका घरावर छापा टाकून ६ किलो ९० ग्रॅम गांजा आणि ६६० रुपये रोख रक्कम असा एकूण ९८,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेचा भाग म्हणून करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई

शहर कोतवाली पोलिसांच्या डीबी पथकाला माहिती मिळाली की, खोलेश्वर परिसरातील लक्ष्मी नगर येथे राहणारा सागर देवराव घन बहादूर (३५) याने गांजा लपवून ठेवला आहे. यावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पथकाने घरावर छापा टाकला आणि गांजा जप्त केला.

जप्त मुद्देमाल

गांजा – ६ किलो ९० ग्रॅम (किंमत: ₹९७,४४०)रोख रक्कम – ₹६६०एकूण किंमत – ₹९८,१००

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:

पोलीस अधीक्षक: अर्चित चांडक

अतिरिक्त पोलीस अधीक्षक: बी. चंद्रकात रेड्डी

उपविभागीय अधिकारी: गजानन पडघन

पोलीस निरीक्षक: संजय गवई

एपीआय: किशोर पवार

सहभागी अधिकारी व कर्मचारी: महेंद बहादुरकर, अश्विन सिरसाट, अजय भाटकर, किशोर येउल, नीलेश बुंदे, शैलेश घुगे, विकास जाधव, महिला पोलीस कर्मचारी रुखसर, कल्याणी पवार, अनिल सोनोने

पोलीसांकडून पुढील तपास सुरू असून, गांजाच्या साठ्याचा स्रोत आणि संभाव्य रॅकेटचा शोध घेतला जात आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!