Join WhatsApp group

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – १३ जुगारींना अटक, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जयहिंद चौक परिसरातील एका गुप्त जुगार अड्ड्यावर छापा टाकत १३ जणांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांना जयहिंद चौक परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले.

अटक करण्यात आलेले आरोपी :

नितीन अशोक गोहर, अनिल गोवर्धन चांडक, महेंद्रसिंग त्रिपालसिंग, मोहसीन सलीम खान, मजहर जाफर खान, शेख राहिल शेख आजर, मोहम्मद अतिक हबीब, सचिन हेमंत सावळे, बशीर राहु खान, शेख रफिक शेख हुसेन, भरत हिम्मत जाधव, उमेश जुंबन दामले, स्वराज दिलीप सिंग.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

५५,००० रुपये रोख रक्कम

११ मोबाईल (मूल्य: १.०१ लाख रुपये)

५ दुचाकी (मूल्य: २.५० लाख रुपये)

एकूण मुद्देमाल किंमत: ४,०६,००० रुपये

ही कारवाई “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत करण्यात आली असून जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी:

सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ ढोले, पोलीस कर्मचारी उमेश परये, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमिर, व वाहनचालक ठाकरे यांनी सहभाग घेतला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!