Join WhatsApp group

महिला न्यायाधीशांशी गैरवर्तन करणाऱ्या वकिलाला न्यायालयीन कोठडी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : दि. २५: लोकशाहीतील न्यायव्यवस्था हा एक अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे. वकील हे त्यांच्या अशिलांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी काम करतात, तर न्यायाधीश हे सत्य तपासून न्याय देतात. मात्र, जेव्हा अशाच व्यवस्थेतील कोणी व्यक्ती न्यायाधीशाशी गैरवर्तन करते, तेव्हा ती घटना केवळ कायद्याचे उल्लंघन नाही तर समाजातील विकृतीचे द्योतक ठरते.

रामदास पेठ येथील महिला न्यायाधीशांशी गैरवर्तन व मानसिक त्रास दिल्याच्या आरोपाखाली अकोल्यातील वकील सौरभ तेलगोटे याला अटक करण्यात आली आहे.

संबंधित न्यायाधीशांनी रामदास पेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने त्यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन करत मानसिक छळ केला.

या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कलम ७४, ७५, ७६, ७८ तसेच आयटी कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. पोलिस कोठडीतील चौकशीत अनेक पुरावे गोळा करण्यात आले असून, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट्सही सायबर पोलिसांच्या मदतीने मिळवण्यात आल्या आहेत.

न्यायालयाने सुरुवातीला दोन वेळा ६ दिवसांची पोलिस कोठडी दिल्यानंतर, गुरुवारी पोलिस कोठडीचा कालावधी संपल्यावर आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत (तुरुंगात) पाठवण्याचे आदेश दिले.पोलिस तपासात आरोपीच्या संपर्कात असलेल्या इतर वकिलांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या वकिलांमध्ये चिंतेचे वातावरण असून, काहींचा सहभाग तपासात समोर येऊ शकतो अशी शक्यता आहे.ही घटना संपूर्ण वकिल संघटना, न्यायपालिका आणि राज्यभरातील नागरिकांच्या चिंतेचा विषय बनली आहे. न्यायालयीन निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!