Join WhatsApp group

भागवत कथेच्या पर्वावर मूर्तिजापूर शहरातून कलश यात्रा संपन्न – टाळ मृदुंगाच्या गजरात शहरातून भव्य कलश यात्रा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर- मुर्तीजापुर शहरात 13 जून पासून सुरू झालेल्या भागवत कथेच्या पर्वावर शहरातून कलश यात्रा काढण्यात आली यामध्ये महिला भजनी मंडळ वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ यांच्या उपस्थितीत कलक्ष यात्रा संपन्न झाली.

हिंदू धर्मात भागवत कथेला मोठी मान्यता आहे देव देश धर्म या सर्वांना घेऊन चालणारे मुर्तीजापुर येथील समाजसेवक रवी राठी यांच्या सौजन्यातून भव्य असा श्रीमद् भागवत कथेचे आयोजन केले आहे मुर्तीजापुर वासियांसाठी आनंदाची गोष्ट आहे की मुर्तीजापुर येथे वरंगल हैदराबाद येथील प्रसिद्ध भागवतकार परमपूज्य श्री पवनकुमारजी मालोदिया यांच्या मधुर वाणीतून दिनांक 13 जून 2025 ते गुरुवार दिनांक 19 जून 2025 पर्यंत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये या कथेच्या सुरुवातीच्या पावन पर्वावर मूर्तिजापूर येथील भक्तीधाम मंदिरातून 13 जून सकाळी भव्य अशी कलश यात्रा निघाली यामध्ये महिला भजनी मंडळ वारकरी संप्रदायाचे टाळकरी मंडळ यांच्या ताळ आणि मृदुंगाच्या गजरात डोक्यावर तुळशी बिंद्रावन कलश घेऊन ही यात्रा मुख्य मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे राठी मार्बल येथे संपन्न झाली या यात्रेमध्ये मुर्तीजापुर नगरीतील अनेक समाज बांधवांनी सहभाग घेतला होता यावेळी रथा मधुन भागवतकार परमपूज्य श्री पवन कुमार जी मालोदिया यांची शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक सुरेश राठी, रवी राठी, ,तथा राठी परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे


Share

Leave a Comment

error: Content is protected !!