Join WhatsApp group

राजस्थानी मारवाडी समाजाचा राजकीय अस्तित्व धोक्यात? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत समाजाच्या एकही व्यक्तीला प्राधान्य नाही.

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राजस्थानी–मारवाडी समाजाला जाणीवपूर्वक बाजूला सारल्याचे तीव्र चित्र आता स्पष्ट होत आहे. शहराच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींमध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या या समाजाला तिकीट न देणे—हे केवळ दुर्लक्ष नाही, तर राजकीय अस्तित्वावर खुपसलेला खंजीर असल्याची भावना समाजात प्रचंड प्रमाणात पसरली आहे.

🔥 भाजपकडून मोठा धक्का

राजस्थानी–मारवाडी समाजाने अनेक वर्षे उमेदवार नाही – फक्त कमळ,या भूमिकेवर ठाम राहून भाजपला सातत्याने पाठिंबा दिला.

मात्र या निष्ठावंत समाजाला भाजपनेच तोंडावर पाडल्याची नाराजी आता उघडपणे व्यक्त केली जात आहे.स्थानिक पातळीवरील नेत्यांचे म्हणणे अधिक गंभीर आहे.

“मुर्तीजापूरचा निर्णय स्थानिकांनी नाही घेतला. सगळी सूत्रे अकोल्यातील काही मोजक्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हातात गेली आहेत. त्यांच्याच चुकीमुळे राजस्थानी मारवाडी समाजाचे प्रचंड राजकीय नुकसान झाले आहे.”

🔥 “राजस्थानी समाज फक्त मतदानापुरताच?”

हा प्रश्न आता शहरभर धगधगतोय.

कारण केवळ भाजपच नव्हे तर कुठल्याही पक्षाने एकाही राजस्थानी–मारवाडी व्यक्तीस तिकीट देण्याचा विचार केला नाही.

यामुळे असे स्पष्ट होते की पक्षांना मत हवे, पण प्रतिनिधित्व नको!

ही घोर अन्यायकारक व धक्कादायक बाब समाजातील लोकांनी स्पष्ट शब्दांत मांडली आहे.

🔥 देशाच्या अर्थव्यवस्थेत राजस्थानी समाजाचा मोठा वाटा

राजस्थानी–मारवाडी समाजाने केवळ शहराच्याच नव्हे तर देशाच्या आर्थिक, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.व्यापारी प्रामाणिकपणा, रोजगारनिर्मिती, उद्योगवृद्धी आणि नागरी विकास— या सर्वांमध्ये या समाजाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

अनेक दशके कर, व्यापार, रोजगार आणि आर्थिक वहातुकीच्या माध्यमातून शहर, जिल्हा आणि राज्याच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करणारा हा समाज आजही कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा असतो.

मात्र त्याच समाजाला आज “नेमके निवडणुकीच्या वेळीच विसरलं जातं”,ही कटूता प्रत्येक राजस्थानी कुटुंब व्यक्त करत आहे.

🔥 प्रचंड नाराजी – पुढील भूमिका तीव्र?

या अन्यायामुळे समाजात भव्य नाराजी असून, पुढील निवडणुकांमध्ये स्वतंत्र भूमिका घेणे, पर्याय शोधणे किंवा राजकीय समीकरणे बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.मुर्तीजापूरच्या राजकारणात हे प्रकरण मोठा भूकंप घडवू शकते.

राजस्थानी–मारवाडी समाज आता शांत बसणार नाही, आता पर्यायी विचार म्हणून दुसरं काही पाहावं लागलनार अशी सूचक भूमिका राजस्थानी मारवाडी समाजाच्या चर्चे मध्ये दिसत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!