Join WhatsApp group

सुरेश जोगडे यांचे हातगाव ग्रामपंचायत विरोधात आंदोलन संशयाच्या भोवऱ्यात?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर (दि. २१):हातगाव येथील सुरेश जोगडे हे मागील सहा दिवसांपासून विविध मागण्या व ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी बेमुदत आंदोलन करत आहेत.

मात्र, हे आंदोलन आता संशयाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे.सध्या सोशल मीडियावर व गावकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे की, हे आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठीची “स्टंटबाजी” आहे का?

कारण, सुरेश जोगडे यांचे चिरंजीव अक्षय सुरेश जोगडे, जे सध्या हातगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, यांनी आजपर्यंत शेकडो तक्रारी ग्रामपंचायत विरोधात करून परत घेतल्या आहेत. हीच बाब चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

तक्रारी केल्यानंतर त्या परत घेण्यामागचे नेमके कारण काय? यावरून सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

तसेच, सुरेश जोगडे यांनी आजवर माहितीच्या अधिकारांतर्गत (RTI) ग्रामपंचायतीत शेकडो अर्ज दाखल केले असून, माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी कुठलाही ठोस पाऊल न उचलल्याने त्यांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यामुळे त्यांचे आंदोलन खऱ्या अर्थाने ग्रामहितासाठी आहे की निवडणूकपूर्व राजकीय रणनीती यावरही चर्चा सुरू झाली आहे.

“सरकार माझा न्यूज”सोबत बोलताना एक ग्रामपंचायत सदस्याने नाव न घेण्याच्या अटीवर दोन परत घेतलेल्या तक्रारींचे लिखित पुरावे सादर करत स्पष्ट केले.

वॉर्ड क्रमांक ३ मध्ये वरघट ते जामनिक यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या कामाविषयी केलेली तक्रार परत घेण्यात आली.

तसेच, सामान्य निधीतून प्रवीण इंगळे यांच्या घरापासून गाजरे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या कामावरील तक्रारही मागे घेण्यात आली.

या प्रकारच्या शेकडो तक्रारींमुळे आणि त्यानंतर त्या मागे घेण्याच्या घटनांमुळे या आंदोलनामागील प्रामाणिक हेतूवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

हातगाव पासून तर तालुक्या पर्यंत आणि चहाच्या टपरी पासून ते सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू असून, येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एक केवळ राजकीय स्टंट असल्याची चर्चा रंगत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!