Join WhatsApp group

अंदर की बात : रस्त्यावर अतिक्रमण दिसते, पण बियाणी जीनचा संकुचित झालेला रस्ता का दिसत नाही?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

शहरात अतिक्रमणा विरोधात नगर परिषद वारंवार मोहीम राबवते, सामान्य नागरिकांच्या गाळ्यांवर, हातगाड्यांवर कारवाई केली जाते. मात्र, बियाणी जीन परिसरातील रस्त्याचे अर्धे अधिक रुंदीकरण थांबवून त्याचा आकार मुद्दाम छोटा का करण्यात आला? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

स्थानिकांनी आरोप केला आहे की, या रस्त्यावर नियमबाह्य सूट देण्यात आली असून, एका विशिष्ट राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळेच बियाणी जीन परिसर वगळण्यात आला. हे अतिक्रमण नगर परिषदेला का दिसत नाही? असा सवाल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नेता कोण? काय नाते मालकाशी?

मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रभावशाली सत्ताधारी नेत्याचे बियाणी जीनच्या मालकाशी वैयक्तिक संबंध आहेत, त्यामुळेच नगर परिषदेच्या अभियंत्यांनी त्या भागातील रस्त्याचे मोजमाप जाणीवपूर्वक थांबवले होते व त्यांना विशेष सूट देण्यात आली होती, या प्रकरणात दबक्या आवाजाला आमदार हरीश पिंपळे यांच्या नावाची पण चर्चा आहे.अशी माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.

जर सामान्य जनतेचे दुकान पाडले जात असतील, तर विशेष व्यक्तींना सूट का? काय हे “न्याय एकसमान” धोरण आहे? असा सवाल आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

कारवाईची मागणी

या प्रकरणात संपूर्ण मोजमाप व आराखडा जनतेसमोर सादर करण्यात यावा, आणि जर चुकीची माफी दिली गेली असेल तर दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे.

आमदार हरीश पिंपळे यांच्या नावाच्या चर्चेला उधान

शहरात हा विषय सध्या जोर धरू लागला असून दबक्या आवाजात या प्रकरणात आमदार हरीश पिंपळे यांच्या नावाच्या चर्चेला उधाण आला आहे. विरोधी पक्षाचे काही कार्यकर्ते नेते यावर जनतेमध्ये उघडपणे चर्चा करताना शहरात दिसत आहे. येणाऱ्या नगरी परिषद निवडणुकीत याचे परिणाम याचे परिणाम होईल. अशी सामान्य जनतेमध्ये चर्चा आहे.

आमदार हरीश पिंपळे यावर दखल घेणार का? याची उत्सुकता सामान्य जनतेला लागली आहे.

विशेष:

या प्रकरणात संबंधित नेत्याचे आणि बियाणी जीन मालकाचे नेमके संबंध काय आहेत, हे देखील लवकरच उजेडात येणार असल्याची माहिती काही सूत्रांनी दिली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!