Join WhatsApp group

रेती बंदीच्या नावावर रेती तस्कराची, महसूल विभागाची बल्ले बल्ले?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक १६ : नरेश वासनिक : चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात रेतीचस्कराच्या बोल बाला महसूल विभागाचा मु काला असे बोलणे काही चुकीचे ठरणार नाही. सध्या घडीला चंद्रपूर जिल्ह्यातील रेती घाटाच्या लिलाव झाला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रेती तस्कर रेतीची चोरी करत असल्याची बोंब चोहीकडे सुरू आहे.

रेती तस्कर चोरीची रेती महागड्या भावात विकत आहे. रेती तस्करांची तसेच महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांची साठे लोटे असल्याचे बोलले जात आहे. गोंडपिपरी तालुक्यातील रेती घाटावरून दररोज रात्री जिवती तालुक्यात रेती आणली जात आहे. कमीत कमी८० किलोमीटर अंतरावरून चोरीची रेतीची वाहतूक केली जात आहे. रेती चोरा सोबत गोंडपिपरी तालुक्यातील, बल्लारशा तालुक्यातील, राजुरा तालुक्यातील व तसेच जिवती तालुक्यातील महसूल अधिकारी तसेच पोलीस विभागाचे अधिकाऱ्यांनी हात मिळवणी केल्याची चर्चा ऐकण्यात येत आहे.

जोपर्यंत चोर चोर मावसरे भाई एक होत नाही तोपर्यंत रेती चोरी करण्याची कोणीही हिंमत करू शकत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी सक्षम असल्यामुळे दररोज कुठे ना कुठे रेतीचे ट्रॅक्टर हायवा ट्रक जेसीपी पकडण्याची नोंद सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्राचे माध्यमातून वाचायला मिळत आहे. जिवती तालुक्यातील घरकुल लाभार्थी रेती घाटाचा लिलावाची प्रतीक्षा करत आहे.

कारण रेती घाटाचा लिलाव झाला तर स्वस्त दरात रेती मिळणार घरकुल बांधण्यात सोपे होणार परंतु शासन प्रशासनला रेती घाटाच्या लिलाव करण्याचा विसर पडला का काय असं प्रश्न सामान्य जनतेला तसेच कंत्राटदाराला पडलेला आहे.

रेती अभावामुळे विकासही खोळंबला आहे. जल जीवन मिशनचे कामे अपूर्ण राहिले आहे व इतरही कामे सुरू झाले नाही. माणिकगड पाडावर पाण्याची टंचाई आतापासूनच गावागावात सुरू झाली आहे. रेती अभावामुळे माणिकगड पहाडा वरील जनतेच्या घसा कोरडाच राहणार का असा प्रश्न पडला आहे. रेती घाटाच्या लिलाव झाला तर जल जीवन मिशनचे अपूर्ण कामे पूर्ण होणार आणि लोकांनची तहान भागणार व इतरही विकासाची कामे थांबलेली आहे.

ते कामे सुरू होणार म्हणून याकडे शासन प्रशासनाने लक्ष देऊन रेती घाटाचे लिलाव करावे. रेती चोरीच्यामुळे लाखो रुपयाच्या महसूल बुडत आहे. ते पण बुडणार नाही महसुलीचे लाखो रुपये शासनाच्या तिजोरीत जमा होणार आणि तिजोरीत भर पडणार रेती घाटाचे लिलाव झाले तर लोकांना रेती स्वस्त दरात मिळणार आणि तालुक्यातील अपूर्ण कामे पूर्ण होणार.

रेती चोर तस्करावर व काही महसूल विभागाचे अधिकारी यांच्यावर आळा बसणार. रेती घाटाचा लिलाव लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील जनतेसह कंट्रकदारांनी केली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!