Join WhatsApp group

अकोला जिल्हा पोलीस दलाचा महत्त्वपूर्ण आदेश प्रसारमाध्यमांशी समन्वय वाढवण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे निर्देश

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला : १४ नोव्हे. २५ : अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी तसेच ठाणे अंमलदार यांना पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी प्रसारमाध्यमांशी योग्य समन्वय राखण्यासाठी स्पष्ट व कडक आदेश जारी केले आहेत.

जनतेपर्यंत अचूक, अधिकृत आणि सत्य माहिती पोहोचण्यासाठी वृत्तपत्र व मिडिया प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. परंतु काही ठिकाणी पत्रकारांना योग्य प्रतिसाद न मिळणे, फोन न उचलणे अथवा अपूर्ण माहिती देणे यामुळे जनतेमध्ये संभ्रम, अर्धवट माहितीचा प्रसार तसेच पोलीस–पत्रकार संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढत असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

याप्रसंगी पोलीस अधीक्षकांनी खालील ९ मुद्द्यांवर तातडीने आणि काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत:


महत्त्वाचे निर्देश –

  1. पत्रकार व मिडिया प्रतिनिधींशी विनम्र, संयमी व सहकार्यशील वर्तन ठेवावे.
  2. अधिकृत, सत्यापित व अचूक माहितीच द्यावी.
    अफवा, अप्रमाणित किंवा तपासाधीन संवेदनशील माहिती देण्यास सक्त मनाई.
  3. माहिती देताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी घ्यावी.
  4. पत्रकारांकडून विचारणा झाल्यास त्वरित माहिती द्यावी.
    उपलब्ध नसल्यास ती कोणत्या वेळेत दिली जाईल हे स्पष्ट सांगावे.
  5. संवेदनशील प्रकरणांमध्ये वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊनच माहिती द्यावी.
  6. माध्यमांशी अनावश्यक वाद, वादग्रस्त विधाने व नकारात्मक टिप्पणी टाळाव्यात.
  7. आदरपूर्वक संवाद व सौजन्याचे संबंध राखणे हे प्रत्येक अधिकारी-अंमलदाराचे कर्तव्य आहे.
  8. पोलीस स्टेशन स्तरावरील चांगल्या तपास, डिटेक्शन व कामगिरी बाबत नियमित ‘प्रेस नोट’ तयार करावी.
  9. तयार केलेली प्रेस नोट पो.नि./स्था.गु.शा. यांना पाठवावी.
    वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतरच ती प्रसिद्ध करण्यात यावी.

पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, वरील आदेशांचे तंतोतंत पालन न करणाऱ्या संबंधित अधिकारी किंवा अंमलदारांवर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!