Join WhatsApp group

कावड यात्रेच्या पूर्वतयारीसाठी आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तिजापूर (दि.२१ जुलै) –श्रावण महिन्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवभक्त कावड यात्रेच्या तयारीसाठी एक महत्वपूर्ण नियोजन बैठक शासकीय विश्रामगृह, मुर्तिजापूर येथे पार पडली.

ही बैठक आमदार हरीश पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या बैठकीस मुर्तिजापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. अजित जाधव, स्व. लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र नेमाडे, लाखपूरी येथील लक्षेश्वर महादेव संस्थानचे अध्यक्ष श्री. राजुभाऊ दहापुते, तसेच विविध कार्यकर्ते व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत यात्रेच्या मार्गाची सुरक्षा, आरोग्य सुविधा, आपत्कालीन व्यवस्थापन, वाहतूक नियोजन आणि श्रद्धाळूंना मिळणाऱ्या आवश्यक सोयींबाबत सविस्तर चर्चा झाली. सर्व यंत्रणा सज्ज असून यात्रेचा भक्तिमय आणि शांततेत अनुभव मिळावा, यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात येत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!