Join WhatsApp group

दारू व गुटखाच्या अवैध धंद्यांना लगाम; माना पोलिसांची निर्णायक कारवाई

Photo of author

By Sarkarmzanews

Share

माना : दिनांक – १४ : जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत माना पोलिसांनी अवैध देशी दारू विक्री तसेच प्रतिबंधित गुटखाच्या वाहतुकीविरोधात प्रभावी कारवाई केली आहे.

देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करताना माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विठ्ठल संतोषराव मुळे (रा. माना) याच्याकडून १२ नग देशी दारूच्या सीलबंद बॉटल तसेच अविनाश सुरेश थोरात (रा. माना) याच्याकडून १८ नग देशी दारूच्या सीलबंद बॉटल असा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याच मोहिमेअंतर्गत प्रतिबंधित गुटखाविरोधात विशेष कारवाई करत गुप्त माहितीच्या आधारे हिवरा कोरडे फाटा येथे नाकाबंदी दरम्यान मोटरसायकल चालक ईरशाद खान अयुब खान (वय ३४, रा. वाठोडा शुक्लेश्वर, भातकुली, अमरावती) याला प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाखूची वाहतूक करताना पकडण्यात आले. आरोपीकडून ९,४७८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा तसेच अंदाजे ६०,००० रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली असून एकूण ६९,४७८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध कलम १२३, २२३, २७४, २७५ बीएनएस तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बदेली चंद्रकांत रेड्डी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सौ. वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार, पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, पो.हे.कॉ. मनोहर इंगळे, सुशील आठवले, मनीष तिवारी, उमेश हरमकर यांनी केली.

अवैध धंद्यांविरोधात “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा माना माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांनी दिला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!