Join WhatsApp group

वन मंत्राच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन सन्मान; ४० दिवसांनी वनक्षेत्रपालाचे निलंबन, १ कोटी १३ लाख रुपयांची अनियमितता

Photo of author

By Sarkarmzanews

Share

वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांनी सुमारे १ कोटी १३ लाखांची वित्तीय अनियमीतता केल्याचे समोर आले आहे. याबाबतची तक्रार निवृत्त रोखपालाने धुळे प्रादेशिक कार्यालयास केली होती.

नंदुरबार : शासनाचे नियम धाब्याबर बसवत स्वतःच्या खात्यावर शासकीय धनादेश वटवून त्यातून ठेकेदारांना पैस अदा करत वित्तीय अनियमितता करणाऱ्या नवापुरच्या वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ४० दिवसांपूर्वीच वन मंत्र्यांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन अवसरमल यांचा सन्मान करण्यात आला होता. यानंतर हि कारवाई झाल्याने नवापूर वन विभागात खळबळ उडाली आहे.

धुळे प्रादेशिक वनसंरक्षक निनू सोमराज यांनी ही कारवाई केली आहे. वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांनी सुमारे १ कोटी १३ लाखांची वित्तीय अनियमीतता केल्याचे समोर आले आहे. याबाबतची तक्रार निवृत्त रोखपालाने धुळे प्रादेशिक कार्यालयास केली होती. या तक्रारीबाबतच्या तथ्यानंतर धुळे प्रादेशिक वनसंरक्षक निनू सोमराज यांनी तीन सदस्यीय समिती चौकशी कामी गठीत केली होती. या चौकशीच्या अहवालानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे.

चौकशी सुरु असताना पुरस्कारासाठी शिफारस विशेष म्हणजे वनदिनी वनमंत्र्यांच्या हस्ते स्नेहल अवसरमल यांना सुर्वण पदक देवून गौरविण्यात आले आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून स्नेहल अवसरमल यांची खात्यांअतर्गत चौकशी सुरु असतांना त्यांना पुरस्कारासाठी शिफारस का करण्यात आली? हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. तर माझ्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई बेकायदेशीर आहे.

वनमंत्र्यांकडे अपील मुळातच वर्ग २ च्या अधिकाऱ्यांना निलंबीत करण्याचे अधिकार हे शासनाला आहेत. धुळे प्रादेशीक वनसंरक्षक यांनी केलेली कारवाई बेकायदेशीर असून या विरोधात वनमंत्र्यांकडे अपिल देखील केले असल्याचे नवापूरच्या निलंबीत वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल यांनी सांगितले आहे. राज्य शासनाने सुवर्ण पदकाने सन्मानित केल्यानंतर काही लोकांच्या मनात वेदना होत आहे, म्हणूनच प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सूडबुद्धीने आणि जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्नेहल अवसरमल यांचे म्हणणे आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!